Wed, Apr 01, 2020 06:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पायल तडवी आत्महत्या : तिघा आरोपी महिला डॉक्टरांना रुग्णालयबंदी

पायल तडवी आत्महत्या : तिघा आरोपी महिला डॉक्टरांना रुग्णालयबंदी

Last Updated: Feb 22 2020 2:02AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील  संशयित डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. या तिघाही आरोपींना त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी नायर रुग्णालयात तूर्तास जाता येणार नाही. असे न्यायमूर्ती साधना जाधव यांनी स्पष्ट केले. मात्र जामीन देताना घालण्यात आलेल्या काही अटी शिथील केल्या. 

दररोज  पोलीस ठाण्यास हजेरी लावण्याची घालण्यात आलेली अट न्यायालयाने शिथील करताना न्यायालयाच्या पूर्व परवानगी शिवाय राज्या बाहेर जाऊन नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच आरोपींचे वैद्यकीय परवाने रद्द करण्याबाबतचे आदेश न्यायालयाने मागे घेेतले.

या तिघींना जामीन देताना घालण्यात आलेल्या अटी शिथील  कराव्यात तसेच उर्वरित पदव्युत्तर शिक्षण पूर्ण  करण्यासाठी नायर रूग्णालयात प्रवेश करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंंती करणारी याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूमर्ती साधना जाधव यांच्या समोर शुक्रवारी सुनावणी झाली. एखाद्या व्यक्तीवर  गंभीर गुन्हा  असला तरी त्यांच्या शिक्षणाचा अधिकार हिरावून घेता येणार नाही, असे मत व्यक्त करताना या तिघाही आरोपींना त्यांचा उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दुसर्‍या युनिट मध्ये बदल करून शकतात का? अशी विचारणा करत राज्य सरकार तसेच नायर रूग्णालयाच्या स्त्रीरोग विभाग प्रमुखांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. त्या नुसार नायर रूग्णालयातील स्त्रीरोग विभागाचे प्रमुख प्रमुख डॉ. गणेश शिंदे यांनी रुग्णालयाची भूमिका स्पष्ट करताना पीडितेच्या कुटुंबियांप्रमाणे तीव्र विरोध असल्याचे स्पष्ट केले.

या तिघींच्या परत येण्याने परिस्थिती पुन्हा गंभीर होईल, तसेच सर्वत्र चुकीचा संदेश जाईल. अशी भूमिका  न्यायालयात मांडली. ती मान्य करून न्यायालयाने उर्वरित शिक्षण पूर्ण करू देण्याची आरोपींची मागणी  फेटाळून लावली.मात्र या तिन्ही आरोपींचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यासाठी दिलेल्या आपल्या पूर्वीच्या आदेशांत बदल करत यासंदर्भात आयएमसीने योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कोर्टाची पूर्व परवानगी न घेता मुंबई न सोडण्याचे निर्देश कायम ठेवत या तिघींना मायग्रेशन सर्टिफिकेट देण्यासही नकार देण्यास नकार दिला.