Sun, Oct 25, 2020 08:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कामगारांशी संबंधित तीन विधेयकावर लोकसभेत शिक्कामोर्तब

कामगारांशी संबंधित तीन विधेयकावर लोकसभेत शिक्कामोर्तब

Last Updated: Sep 22 2020 8:51PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

विरोधी पक्षांनी घातलेल्या बहिष्कारात कामगारांशी संबंधित तीन विधेयकांना लोकसभेने मंगळवारी मंजुरी दिली. इंडस्ट्रियल रिलेशन कोड बिल, कोड ऑन सोशल सेक्युरिटी बिल आणि ऑक्यूपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडीशन्स कोड बिल अशी ही तीन विधेयके आहेत.

कामगारांच्या सामाजिक सुरक्षेची तरतूद या विधेयकांमध्ये करण्यात आली असल्याचा दावा सरकारने केला होता तर यामुळे कधीही मनमानी पध्दतीने कामगारांना कामावरून काढून टाकण्याची मुभा कारखाना मालक, कंपन्या व नियुक्तीदारांना मिळेल, असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत ही विधेयके मांडली. 

कामगारांच्या संपाच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याचे विविध पक्षीय नेत्यांनी चर्चेत सहभाग घेताना सांगितले. कामगार संख्या 300 पर्यंत असलेल्या आस्थापनांमध्ये सरकारच्या परवानगीशिवाय कामगारांना कामावरून काढून टाकण्याची मुभा इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड बिलात देण्यात आली आहे. यामुळे आगामी काळात लाखो लोक बेरोजगार होऊ शकतात तसेच हे प्रस्ताव कामगारविरोधी असल्याचा आक्षेप अनेक खासदारांनी घेतला. सरकारच्या परवानगीशिवाय कामगारांना कामावरून काढून टाकण्याची सध्याची सीमा शंभर इतकी आहे. 

 "