Sat, May 30, 2020 01:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पंढरीनाथ पठारे यांना शिवछत्रपती पुरस्‍कार घोषित 

पंढरीनाथ पठारे यांना शिवछत्रपती पुरस्‍कार घोषित 

Last Updated: Feb 19 2020 1:17AM

पंढरीनाथ पठारेमुंबई : पुढारी वृत्तसेवा

कुस्तीला नावारूपास आणण्यास मेहनत घेणारे पंढरीनाथ पठारे यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मुंबईमध्ये क्रीडा मंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्य मंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. 

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार सांगलीचे युवराज बाळू खटके (अॅथलेटिक्स), बीडचे बाळासाहेब आवारे (कुस्ती), पुण्याचे नितीन प्रभाकर खत्री (तायक्वांडो), पुण्याचे जगदीश मनोहर नानजकर (खो-खो) आणि कोल्हापूरचे अनिल बंडू पोवार (पॅरा अॅथलेटिक्स) यांना देण्यात येणार आहे. शनिवारी २२ फेब्रुवारीला ५ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.