Tue, Mar 09, 2021 15:32
लग्नासाठी घर सोडलं आणि जिवानिशी गेली! प्रियकराने केलेल्या कृत्याने मानवताही थरकापली

Last Updated: Jan 16 2021 6:36PM
पालघर ः पुढारी ऑनलाईन 

एखादी तरुणीने प्रेमात पडावं आणि आपल्या जोडीदारासोबत संसार थाटण्याचं स्वप्न पहावं. प्रेमाखातर घरातील सदस्यांशी विद्रोह करून जोडीदारासोबत पळून जावं आणि त्या पाशवी मनोवृत्तीच्या प्रियकराने तिच्या मनात वेगळाच कावा ठेवून तिचा लग्नाचा तगादा कायमचा मिटवून टाकावा, यासाठी सरळ तिचा खून करावा. इतकंच नाही तर, तिचा मृतदेह फ्लॅटच्या भिंतीमध्ये पुरून ठेवावा आणि त्या भिंतीवर चक्क बांधकाम करावं... ही घटना काल्पनिक नाही की, एखाद्या चित्रपटातील पटकथा नाही. मनोरंजनासाठी पाहावं आणि सोडून द्यावं. या काल्पनिक वाटणाऱ्या घटनेला वास्तव स्वरूप देऊन आपल्या प्रियेसीचा खून करणारी घटना पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळ घडली आहे. 

अधिक वाचा ः लग्न करण्यास तगादा लावल्याने भिंतीत पुरला प्रेयसीचा मृतदेह आणि भिंतीवर केलं बांधकाम

या घटनेत दुर्दैवाने या घटनेत जिचा अंत झाला तिचं नाव अमिता मोहिते. अमिता ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करण्यासाठी आपल्या विश्वासू जोडीदाराबरोबर लग्न करण्यासाठी घरातून निघून गेली. या घटनेने अमिताच्या घरातील सदस्यांनी तिची शोधाशोध सुरू केली. दरम्यान, प्रियकर अमिताच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून अमिताच्या घरातील सदस्यांशी संपर्क साधत होता. इथंच घरातल्यांच्या मनात शंका निर्माण झाली आणि घटनेचा तपास वेगाने सुरू झाला. अमिताच्या घरातल्यांनी बोईसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

अधिक वाचा ः तो त्याचा त्याच्या प्रेमात पडला आणि घात झाला!

घटनेच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांची वेगाने सूत्रं हलली आणि पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळच असलेल्या वाणगावमध्ये पोलिस पोहोचले. त्या गावातील वृंदावन इमारतीत पोलिसांनी प्रवेश केला आणि फ्लॅटच्या भिंतीजवळ पोलिसांनी पाहिले तर, भिंतीत अमिताचा मृतदेह अवस्थेत आढळून आला. या भयानक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. प्रियकर आरोपीची चौकशी केली असता स्पष्ट कबूली दिली की, "अमिताने लग्नाचा तगादा लावल्याने आपण तिची खून करून तिचा मृतदेह फ्लॅटच्या भिंतीत गाडून त्याच्यावर बांधकाम केले." विशेष म्हणजे हा प्रियकर त्याच फ्लॅटमध्ये ४ महिन्यांपासून राहत होता. 

अधिक वाचा ः सांगलीत पाच किलो सोने लुटणारी टोळी जेरबंद

आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्या हातात सोशल मीडिया आला अन् दूर कोसावर असणाऱ्या अनोळखी तरुण-तरुणी आभासी जगात एकत्र यायला सुरुवात झाली. यातूनच ही आभासी मैत्री घट्ट होते आणि वास्तव जगात प्रवेश करू लागते. हळूहळू मैत्रिचं रुपांतर प्रेमात होऊ लागतं आणि त्या प्रेमाचा अंत भयानक होतो. वास्तविक पाहता यामध्ये समाजातील तरुण-तरुणीच नाहीत,तर विवाहित महिला आणि पुरूषदेखील आघाडीवर आहेत. आयपीसी कलम ४९७ सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे लिव्ह इन रिलेशनशीप, परपुरुषाशी अनैतिक संबंध आणि त्यातून अनैतिक संबंधाला खतपाणी मिळतं. काही अपवाद वगळता गुन्हेगारीविश्वात कधी महिलांचा बळी जातो, तर कधी पुरुषांचा बळी ठरतो.