Sun, Oct 25, 2020 07:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › PL 2020 : कोण आहे हा सिक्सर किंग राहुल तेवतिया?

PL 2020 : कोण आहे हा सिक्सर किंग राहुल तेवतिया?

Last Updated: Sep 28 2020 11:38AM

राहुल तेवतियाशारजा : पुढारी ऑनलाईन

आयपीएल २०२० मध्ये राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर ४ गडी राखून विजय मिळवला. राहुल तेवतियाने शेल्डन कॉट्रेलच्या एका ओवरमध्ये ५ षटकार ठोकले आणि राजस्थानने बाजी मारली. या सामन्यानंतर सगळीकडे चर्चा आहे ती राहुल तेवतियाची. त्याच्या विषयी काही गोष्टी जाणून घेऊया... 

वाचा : IPL 2020 : तेवतियाचे एका ओवरमध्ये ५ षटकार, सेहवाग म्हणाला... 

२७ वर्षीय राहुल तेवतिया हा फरिदाबाद येथील आहे. तेवतिया पहिल्यांदा २०१८ मध्ये चर्चेत आला होता. त्यावेळी तेवतियाला खरेदी करण्यासाठी आयपीएल संघामध्ये स्पर्धा लागली होती. त्याची बेस प्राइस केवळ १० लाख होती. त्यानंतर काही मिनिटांतच त्याला लावलेली बोली २.५ कोटींपर्यंत पोहोचली. तो याआधी किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खेळत होता. त्यानंतर दिल्ली डेअरडेविल्सने त्याला ३ कोटीला खरेदी केले होते. दोन हंगामानंतर गेल्या वर्षी त्याला राजस्थानने त्याला आपल्या संघात घेतले.

वाचा : KXIPvsRR : लेट तापलेल्या तेवातियाने अशक्यप्राय विजय आणला खेचून

रणजीमध्ये पदार्पण...

२०१३ मध्ये तेवतियाने हरियाणाकडून खेळत रणजीमध्ये पदार्पण केले होते. त्याला केवळ ७ फर्स्ट क्लास सामने खेळण्यासाठी संधी मिळाली. तेथे त्याने १९० धावा केल्या. याच दरम्यान त्याने १७ विकेट घेतल्या. त्याने आतापर्यंत ५० टी-२० सामने खेळले आहेत. त्याची सर्वाधिक धावसंख्या ९१ एवढी आहे. टी-२० मध्ये त्याचा स्ट्राइक रेट १५३ आहे. 

वाचा : मयांक आणि केएल राहुलचा आयपीएलच्या इतिहासातील आगळावेगळा पराक्रम!

एका ओवरमध्ये ५ षटकार....

राजस्थानने तेवतियावर विश्वास दाखवत त्याला चौथ्या स्थानी खेळायला पाठविले. चौथ्या नंबरवर बॅटिंग करण्यास आलेल्या राहुल तेवतियाला सुरुवातीला एक-एक धावा घेण्यासाठी धडपड करावी लागली. तेवतियाने पहिल्या ८ धावा १९ चेंडूत केल्या. संजू सॅमसन आउट झाल्यानंतर राजस्थानने सामना जिंकण्याची आशा सोडून दिली होती. मात्र, तेवतियाने एक ओवरमध्ये चित्र बदलून टाकले. त्याने शेल्डन कॉट्रेलच्या एका ओवरमध्ये ५ षटकार लगावले आणि राजस्थानला विजय मिळवून दिला. 

 "