Fri, Aug 07, 2020 15:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी  उत्सवात प्रो-गोविंदाचे आयोजन

 संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी  उत्सवात प्रो-गोविंदाचे आयोजन

Published On: Sep 04 2018 1:18AM | Last Updated: Sep 04 2018 1:00AMठाणे : प्रतिनिधी 

आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या यावर्षी पहिल्यादांच प्रो-गोविंदाचे  आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील 10 पथके, तर ठाण्यातील पाच अशा 15 पथकांना या प्रो-गोविंदा उत्सवात संधी देण्यात आली. चित्रपट कलाकारांच्या हजेरीबरोबरच नाट्य आणि नृत्यांचा आविष्कार या ठिकाणी रसिकांना पाहायला  मिळाला. संध्याकाळपर्यंत तीन गोविंदा पथकांनी 8 थरांची सलामी दिली. तर रात्री उशिरापर्यंत 9 थर लावण्याचे गोविंदा पथकांचे प्रयत्न सुरू होते.

बॉलीवूडमध्ये देशभक्तीपर चित्रपट दिग्दर्शन केलेले जे.पी दत्ता यांचा पलटन हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची संपूर्ण टीमने संस्कृतीच्या दहीहंडीला हजेरी लावली.  त्याचबरोबर नितीन ठक्कर दिग्दर्शित मित्रो चित्रपटातील जॅकी भगनानी आणि क्रितिका कम्रा, बहुचर्चित असलेला सलमान खान प्रोडक्शनचा ‘लव रात्री’ चित्रपटातले आयुष शर्मा आणि वरिना हुसेन देखील संस्कृती हंडीला उपस्थिती लावली.  

अशी आहे प्रो-गोविंदाची थीम 

जे गोविंदा पथक 8 मनोरे रचल्यावर काही वेळ स्थिर राहून न पडता व्यवस्थित खाली उतरतील अशांना 5 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मात्र या उत्सवात सहभागी झालेल्या मुंबई आणि ठाण्यातील सर्वच 15 गोविंदा पथकांना 50 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. 

ठाण्यातील पथके
सहयोग गोविंदा पथक
ठाण्याचा राजा गोविंदा पथक
सार्वजनिक गोकुळअष्टमी उत्सव
गौरी शंकर सिद्धिविनायक गोविंदा पथक
आम्ही कोपरीकर गोविंदा पथक

प्रो-गोविंदासाठी सहभागी मुंबईतील पथके     

अष्टविनायक क्रीडा मंडळ, वडाळा
माजगाव दक्षिण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ताडवाडी
हिंदू एकता गोविंदा पथक, जोगेश्वरी
कोकण नगर गोविंदा पथक, जोगेश्वरी
बालवीर गोविंदा पथक, चेंबूर
धारावीरकर आर्यन ग्रुप, धारावी
विघ्नहर्ता गोविंदा पथक, सांताक्रूझ
बालमित्र व्यायाम शाळा, सांताक्रूझ
शिवशाही गोविंदा पथक, बोरिवली
जय जवान गोविंदा पथक, जोगेश्वरी