Wed, Aug 12, 2020 21:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शहरी औद्योगिक जमिनी बांधकामांसाठी खुल्या

शहरी औद्योगिक जमिनी बांधकामांसाठी खुल्या

Published On: Jan 03 2018 1:29AM | Last Updated: Jan 03 2018 1:24AM

बुकमार्क करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

शहरातील गिरण्या आणि औद्योगिक जमिनीवर आधीच मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले असताना ही प्रक्रीया आणखी गतीमान होणार आहे. औद्योगिक प्रकल्प बंद पडल्यामुळे शहरांमध्ये विनावापर पडून असलेल्या जमिनींचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने धोरण तयार केले असून त्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

विविध कंपन्यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून स्वत:च्या खर्चाने 1894 च्या भूसंपादन अधिनियमानुसार भाग-सात खाली जमिनी संपादित केल्या आहेत. या कंपन्या 1970 अथवा त्यापूर्वीपासून सुरू करण्यात आल्या आहेत. काही कंपन्यांनी या जागांचा काही काळासाठी औद्योगिक वापरही केला. मात्र, त्यानंतर हे उद्योग शहराबाहेर स्थलांतरित झाले. तर काही उद्योग विविध कारणांनी बंद पडलेले आहेत. प्रदूषणाच्या तक्रारींमुळेही काही उद्योग इतरत्र हलवावे लागले आहेत. काही उद्योगांवर वित्तीय संस्थांची कर्जे, कामगारांची देणी, न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत. अशा जमि नी आता विकासासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत.