Sun, Oct 25, 2020 08:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशात केवळ 28.21 टक्के बाधित! 

देशात केवळ 28.21 टक्के बाधित! 

Last Updated: Aug 12 2020 1:35AM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा

देशात दिवसागणीक कोरोना महारोगराईचा विळखा घट्ट होत असताना मंगळवार थोडा दिलासा देणारा ठरला. गेल्या सहा दिवसांमध्ये पहिल्यांदा कोरोनाबाधितांच्या संख्येत किरकोळ घट झाली आहे. एकूण सक्रिय कोरोना रुग्णसंख्येचा आलेखही कमी होत आहे.

देशात सध्या केवळ 28.21 टक्केच सक्रिय कोरोनाग्रस्त आहेत. देशात कोरोना महारोगराईचा संसर्ग सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच देशातील मृत्यू दर 2 टक्क्यांहून खाली पोहोचला आहे. असे असताना देशातील एकूण बाधितांच्या संख्येने साडेबावीस लाखांचा टप्पा ओलांडला आहे. 

देशातील कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे 22 लाख 68 हजार 675 एवढी झाली आहे. यातील 15 लाख 83 हजार 489 रुग्णांनी (69.80 टक्के) कोरोनावर मात मिळवली आहे. तर 6 लाख 39 हजार 929 रुग्णांवर (28.21 टक्के) देशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 45 हजार 257 रुग्णांचा (1.99 टक्के) कोरोनाने बळी घेतला आहे.

देशातील कोरोनामुक्‍तीचा दर मंगळवारी 69.80 टक्के झाला आहे. देशातील मृत्यू दर 1.99 टक्के झाला आहे. सोमवारी 6 लाख 98 हजार 290 नागरिकांच्या कोरोना तपासण्या झाल्या.
देशात आतापर्यंत 2 कोटी 52 लाख 81 हजार 848 नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या केल्याची माहिती ‘आयसीएमआर’कडून देण्यात आली आहे. देशातील विविध राज्यांत असलेल्या 1 हजार
310 प्रयोगशाळांमध्ये कोरोना तपासण्या केल्या जात आहेत.

53 हजार रुग्णांची भर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळपर्यंत देशात 53 हजार 601 कोरोनाबाधितांची भर पडली. तर 871 रुग्णांचा मृत्यू झाला. सोमवारी 47 हजार 746 रुग्ण कोरोनामुक्‍त झाल्याने त्यांना विविध रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
 

 "