Thu, Aug 06, 2020 03:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोनामुळे आता केवळ १५% कर्मचार्‍यांच्या बदल्या

कोरोनामुळे आता केवळ १५% कर्मचार्‍यांच्या बदल्या

Last Updated: Jul 08 2020 1:07AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे कर व इतर उत्पन्नात घट झाल्यामुळे राज्य सरकारने केवळ 15 टक्के कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पन्नातील अपेक्षित महसुली घट व त्याचे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. दरवर्षी एप्रिल आणि मेमध्ये 33 टक्के सरकारी कर्मचारी व अधिकार्‍यांच्या  बदल्या केल्या जातात. आता केवळ 15 टक्के बदल्या करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. 

या निर्णयामुळे सरकारी कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे.  एप्रिल ते मे या कालावधीमध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सरकारने काही अपवाद वगळता कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या.  प्रशासकीय बाब म्हणून कर्मचार्‍यांच्या बदल्या होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी राज्य सरकारने अशा परिस्थितीमध्ये 30 टक्के कर्मचार्‍यांच्या बदल्या करू नयेत, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले होती. या विनंतीची दखल घेऊन सरकारने 31 जुलैपर्यंत एकूण कार्यरत पदांच्या केवळ 15 टक्के एवढ्या मर्यादित बदल्या करण्यास अनुमती दिली आहे.