Thu, Sep 24, 2020 15:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता आली 'गो कोरोना' हेअर स्टाईल

आता आली 'गो कोरोना' हेअर स्टाईल

Last Updated: Aug 13 2020 1:10PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढला आणि लॉकडाऊन करण्यात आले. भारतात मात्र काही नागरिकांनी कोरोनाची मजा घेतली. अगदी क्वारंटाईन सेंटरमध्ये डान्स असो वा कोरोनाची गाणी एन्जॉय करणं. त्यानंतर आता एका हेअर सलूनमध्ये गो कोरोनाची थीम घेऊन हेअर कट सुरू केला आहे. या गो कोरोना कट हेअर स्टाईलने अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

अधिक वाचा :देशात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक; एका दिवसात तब्बल ६७ हजार रुग्ण

लोकांच्या मनात कोरोना विषाणूबाबतची भीती दूर करण्यासाठी पीक्सी आर्ट सलूनने हा नवीन ट्रेंड सुरू केला आहे. लॉकडाऊनच्या पाच महिन्यानंतर मुंबईतील सलून हळूहळू उघडू लागली आहेत. अजूनही अनेकांनी सलूनकडे पाठ फिरवली आहे. तरी काही तरुण वेगवेगळ्या स्टाईलने आपले केस कापून घेण्यासाठी जात आहे. हेअर कटमध्ये आता नव्या 'कोविड कट'ची भर पडली आहे. अधिकतर तरुणांचा कल हा कोविड कट करण्याकडे आहे.

अधिक वाचा : मुंबई : कांदिवलीस ज्यूस कारखान्यात आग

कोरोनामुळे तरुणांचा ओढा आता कोरोना संबंधी हेअर कट करण्याकडे असल्याचे दिसून येत आहे. ‘गो कोरोना' ,'कोरोना कट', 'कोरोना १९' असे नवीन हेअर कट आले असून कोरोना विषाणुंचे चित्र रेखाटण्याकडे कल असल्याचे दिसत आहे. गोकुळाष्टमीनिमित्त कोरोना विरोधातील दहीहंडी देखील कोरण्याचा ट्रेंड सध्या आल्याचे दिसते.

अधिक वाचा : अर्धवट इमारती तीन वर्षांत पूर्ण करणे म्हाडाला आता बंधनकारक!

डोक्याच्या मागील बाजूचे केस झिरो मशिनने बारीक केली जातात. त्यानंतर त्यावर कोविड १९, गो कोरोना, कोरोनाचे चित्र कोरले जाते. या हेअर कटसाठी १ ते दीड तासांचा अवधी लागतो. शिवाय या कटसाठी पैसे देखील अधिक मोजावे लागतात. 

सध्या कोरोनाची दहशत सगळीकडे आहे. लोकांमध्ये प्रचंड भीती आहे. त्यामुळे लोकांमधील भीती काढण्याची गरज आहे. लोकांमध्ये जनजागृती करण्याठी गो कोविडचा हेअर कट करून घेतला आहे.

-  प्रणव सपकाळ, ग्राहक

वेगवेगळे सण, ऋतू, घटना यानुसार आता हेअर कट केले जातात. गुरू पौर्णिमा, स्वातंत्र्य दिन, गोकुळाष्टमी, होळी, नवीन वर्ष यानुसार हेअर कटला फार मागणी असते. मागणी सार आम्ही देखील नवीन हेअर कट स्टाईल सुचवत असतो. सध्या मुंबईत सलून उघडण्यास सुरूवात झाली आहे. मात्र लोकांमध्ये भीती असल्याने लोक सलूनकडे फिरकत नाहीत. आम्ही सुरक्षेसाठी सर्व प्रकारची काळजी घेत आहोत. असे असले तरी लोकांच्या मनातील भिती काढण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही गो कोरोना यांसारख्या हेअर कटचा नवा ट्रेंड सुरू केला आहे. त्यातून कोरोनाच्या विरोधात लढण्याचा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत
- विनोद कदम ,पीक्सी आर्ट सलूनचे मालक

 "