Tue, Jun 15, 2021 13:23




मला महाराष्ट्राची आणि राष्ट्रवादीच्या भवितव्याची चिंता वाटत नाही : शरद पवार (video)

Last Updated: Jun 10 2021 12:19PM





मुंबई; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेस आज (ता.१०) २२ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा तसेच पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. महाविकास आघाडी सरकारला जनतेनं स्वीकारल आहे. हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला. 

यावेळी त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना टोला लगावला. काही लोक गेल्याने काही लोक तयार झाल्याचे शरद पवार म्हणाले. देशात अनेक पक्ष आले आणि गेल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना आणि आपण एकत्र येऊ असं वाटलं नव्हत, पण आज एकत्र आहोत असे त्यांनी सांगितले.