Mon, Jul 13, 2020 01:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › #NisargaCyclone 'निसर्ग चक्रीवादळाचा प्रवास होणार पनवेलमधून' (video)

'निसर्ग चक्रीवादळाचा प्रवास होणार पनवेलमधून' (video)

Last Updated: Jun 03 2020 10:44AM
पनवेल : पुढारी वृत्तसेवा 

अरबी समुद्रातून सुरू झालेल्या " निसर्ग वादळ " हे रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर येऊन धडकणार आहे. या वादळाचा केंद्रबिंदू पनवेल शहरातून नाशिक मार्गाने मार्गक्रमण करणार असल्याची माहिती पनवेलचे प्रांत दत्तात्रेय नवले यांनी दिली आहे. हे वादळ उरण मार्ग पनवेल शहर आणि नेरे मार्गातून नाशिककडे मार्गक्रमण करणार असल्याची माहिती पनवेलचे प्रांत दत्तात्रय नवले यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली. खबरदारी म्हणून पनवेल तालुक्यातील ५५ कुटूंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 

निसर्ग चक्रीवादळाचा केंद्रबिंदूचा प्रवास पनवेल तालुक्यातून असल्यामुळे नागरिकांनी घरात बसावे, कितीही अत्यावश्यक काम असले तरी पुढील सुचना येईंपर्यत घरातून बाहेर पडू नये, कच्चे बांधकाम असलेल्या घरात कोणी राहू नये तसेच योग्य ती साधने घेऊन घरात बसावे, मोठी झाडे, विजेचे पोल या पासून लांब उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. 

निसर्ग चक्री वादळाचा प्रवास

दुपारी साडे बारा ते दुपारी अडीचपर्यंत उरणमधील कोप्रिली - दिघोटे -गव्हाण- नेरे मार्गवरून ते नाशिकच्या दिशने चक्रीवादळाचा प्रवास असणार आहे. या कालावधीत १०० ते १२० प्रतीतास या वेगाने हे वारे वाहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पनवेलचे प्रांत दत्तात्रेय नवले यांनी केले आहे.