Fri, Sep 18, 2020 14:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : बिलात दोष आढळणाऱ्या १० रूग्णालयांना महापालिकेने बजावल्या नोटीसा

मुंबई : बिलात दोष आढळणाऱ्या १० रूग्णालयांना महापालिकेने बजावल्या नोटीसा

Last Updated: Aug 12 2020 8:33PM

संग्रहीत छायाचित्रनवी मुंबई: पुढारी वृतसेवा

काही खासगी रूग्णालयांकडून रूग्णांवर उपचार केल्यानंतर अवाजवी बिलाची आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी नवी मुंबई महापालिकेकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत आज नियुक्त केलेल्या समितीने देयकांच्या पडताळणीमध्ये दोष आढळल्याचे समोर आल्याने १० खासगी रूग्णालयांना महापालिकेने कारणे दाखवा नोटीसा बजावल्याने खळबळ उडाली आहे. 

खासगी रूग्णालयाकडून कोणत्याही रूग्णाची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे अथवा देयक रक्कमेमध्ये विसंगती असल्याचे निदर्शनास आल्यास त्या रूग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले होते. त्याअनुषंगाने या १० रूग्णालयांना कारणे दाखवा नोटीस महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाठवल्या आहेत.

नवी मुंबईतील एकाही रूग्णाची आर्थिक फसवणूक होऊ नये. खासगी व धर्मादाय रूग्णालयांना तसे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांवर योग्य प्रकारे उपचार केले जावेत व त्या उपचारांसाठी खासगी रूग्णालयांकडून २१ मे रोजीच्या शासन अधिसूचनेनुसार प्रत्येक बाबींसाठी निश्चित केलेले वाजवी शुल्क आकारले जावे याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले होते.  या आदेशामध्ये वैद्यकीय उपचार, सुविधा व देयक अशा सर्व बाबींवर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून रूग्णालयनिहाय नियुक्त केलेल्या पालिकेच्या नोडल अधिकारी यांनी त्याबाबतच्या अंमलबजावणीवर काटेकोर लक्ष ठेवण्याचे निर्देशित दिले आहे.

वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ

त्यापूर्वीही पालिकेच्या वतीने खासगी रूग्णालयांना २१ मे च्या शासन अधिसूचनेनुसार देयक रक्कम आकारण्यात यावी असे सूचित केले होते. मात्र वाजवी शुल्क आकारण्या ऐवजी अवाजवी शुल्क रूग्णालयांकडून घेतले जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त (१) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष लेखा परीक्षण पडताळणी समिती स्थापण करण्यात आल्या होत्या. या समितीच्या वतीने करण्यात आलेल्या प्रथमदर्शनी पडताळणीमध्ये १० खासगी रूग्णालयांनी केलेल्या देयकांच्यात दोष आढळले आहेत. त्याकारणाने या १०  रूग्णालयांना महापालिकेने कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. 

कॅबिनेट बैठकीनंतर अजित पवार शरद पवारांच्या भेटीला; जयंत पाटीलही सोबत!

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याचे व मृत्यू दर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवून कोरोना रूग्णांवरील उपचारांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. निश्चित केलेल्या दरांनेच खाजगी रूग्णालयांनी उपचार करणे बंधनकारक असल्याने त्याचीही काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी रूग्णालयातील देयकाबाबत कोणत्याही नागरिकाची काही तक्रार असल्यास अतिरिक्त आयुक्त (१) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत रूग्णालय देयकांबाबतच्या विशेष लेखा परीक्षण पडताळणी समितीकडे लेखी तक्रार करण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे. जेणेकरून सदर तक्रारीचे निराकरण २४ तासात करणे शक्य होईल.  

 "