बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी मुच्छड पानवालास अटक

Last Updated: Jan 12 2021 9:48AM




मुंबई: पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या मुच्छड पानवाला (Muchhad Paanwala) याला अंमलीपदार्थ विरोधी पथकाने (NCB) ने अखेर अटक केली आहे. आधी एनसीबीने त्याला समन्स बजावला होता. त्यानंतर आज अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

कोण आहे मुच्छड पानवाला?

मुंबईतील सर्वात पॉश भागात, kems कॉर्नरवर मुच्छड पानवाल्याचं एक पानाचं दुकान आहे. बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्जाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला प्रकरणात चौकशीसाठी मुच्छड पानवालाचे मालक के जयशंकर तिवारी याचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्याला सोमवारी समन्स पाठवण्यात आला होता. सोमवारी दिवसभर त्याची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्याच्याकडूनतर ड्रग्स प्रकरणाची माहिती घेण्यासाठी एनसीबीने तिवारीला अटक केली. केम्स कॉर्नरवर असलेल्या त्याच्या दुकानात मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा सुद्धा सापडला होता.

यापूर्वी एनसीबीने अनेक बॉलिवूडच्या सेलिब्रेटींना चौकशीला बोलावले होते. यामध्ये दीपिका पदुकोण, सारा खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे.तर अर्जुन रामपाललाही एनसीबीने दोन वेळा चौकशीसाठी बोलावलं होतं. त्याचबरोबर त्याच्या बहिणीला सुद्धा चौकशीला बोलावण्यात आले आहे.