Tue, Jun 15, 2021 13:14
‘फॅमिली मॅन टू’ मधील चेल्लम सरांनी दिली मुंबई पोलिसांना टीप

Last Updated: Jun 11 2021 7:43PM

मुंबई: पुढारी ऑनलाईन 

सध्या ‘द फॅमिली मॅन’ या वेब सिरीजीने धुमाकूळ घातला असून या सिरीजमधील चेल्लम सर हे पात्र प्रचंड गाजत आहे. अनेक गुंते सोडविणाऱ्या या पात्राचा उपयोग करून मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी मोहिमेबाबत एक मिश्किल ट्विट केले आहे. हे ट्विट सध्या चर्चेचा विषय असून चेल्लम सर भलतेच फेमस झाले आहेत. 

वाचा : वीकेंड लॉकडाऊन: कोल्हापुरात उद्या-परवा ‘हे’ राहणार सुरू

ओटीटीवर मनोज बाजपेयी याची 'द फॅमिली मॅन २'. ही वेब सीरिज प्रेक्षकांना मनावर गारूड घालत आहे. या सीरिजमधील प्रत्येक पात्राचं भरभरून कौतुक करत आहेत. त्यातही संपूर्ण सीरिजमध्ये फक्त १५ मिनिटांच्या कालावधीसाठी दिसलेले चेल्लम सर भलतेच चर्चेत आहेत. आता पोलिसही चेल्लम सरांचा आधार घेत आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी चेल्लम सरांचा फोटो ट्विट केला होता. आता मुंबई पोलिसांनीही चेल्लम सरांचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोत संवाद दाखविण्यात आला असून दुसरा व्यक्ती चेल्लम सरांकडे चिलीम मागत आहे. मात्र, चेल्लम सर त्याला १०० नंबर डायल करायला सांगत आहेत. या टि्‌वटच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी ट्वीट करत अंमली पदार्थांचं सेवन करणं गुन्हा असल्याचं सांगितले आहे. चेल्लम सर चिलीम मागणाऱ्याला ‘COD (कॉप्स ऑन डिलिव्हरी) साठी १०० डायल करा.’ असे सांगतात. 

यापूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी चेल्लम सरांच्या मदतीने त्यांच्या क्षेत्रात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी ट्वीट करत संकटात सापडलेल्या प्रत्येक कुटुंबासाठी ११२ हा एकच नंबर असल्याचे म्हटले होते. 

वाचा : येत्या पाच दिवसात 'या' जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस