Mon, Sep 21, 2020 11:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने : अनिल देशमुख

मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने : अनिल देशमुख

Last Updated: Aug 03 2020 12:27PM

गृहमंत्री अनिल देशमुखमुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासावरुन महाराष्ट्र आणि बिहारमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याचे म्हटले आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांसह बिहार पोलिस करत आहे. याच दरम्यान बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबईत क्वारंटाईन करण्यात आले आहे. यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी, जे काही झाले आहे ते ठिक झालेले नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आमची जबाबदारी निभावत आहोत. पाटणा शहराचे एसपी विनय तिवारी यांच्यासोबत मुंबईत जे काही झाले ते चुकीचे आहे. याबाबत आम्ही महाराष्ट्र सरकारकडे चर्चा करु, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे.   

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी नोंदवलेल्या जबाबाच्या आधारे तपास सुरु असल्याचे मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले. १३ आणि १४ जूनचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
 

 "