Mon, Sep 21, 2020 11:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सुशांत मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा

सुशांत मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा

Last Updated: Aug 03 2020 1:09PM

मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सुशांत राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा मुंबई पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. सुशांतच्या घरी कुठलीही पार्टी झाल्याचे पुरावे नाहीत, अशी माहिती मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास करणारे पाटणाचे एसपी विनय तिवारी यांना बीएमसीने क्वारंटाईन केले, या पार्श्वभूमीवर परमबीर सिंह यांनी एका पत्रकार परिषदेत सुशांत प्रकरणी सुरु असलेल्या तपासाविषयी माहिती दिली.  

Bollywood's many maladies - The Hindu

                                सुशांत राजपूत

परमबीर सिंह म्हणाले, सुशांतच्या बँक व्यवहारांचा तपास सुरू आहे. १३ आणि १४ जूनचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. आतापर्यंत ५६ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. नोंदवलेल्या जबाबांच्या आधारे योग्य दिशेने तपास सुरू आहे. सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सॅलियनने बाराव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे सुशांतचे दिशाशी संबंध जोडल्याने तो तणावात होता का? दिशा सालियनच्या बाबतीतही पोलिसांकडून तपास सुरू आहे. या  प्रकरणात घातपाताच्या शक्यतेबाबत अधिक तपास सुरू आहे. 

Disha Salian, ex-manager of Sushant Singh Rajput, Varun Sharma ...

                                दिशा सालियन

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाटणाहून मुंबईत आलेले एसपी विनय तिवारी यांना बीएमसीने क्वारंटाईन केल्याची माहिती मुंबई पोलिसांना नव्हती. एसपींना क्वारंटाईन करण्याची कारवाई पालिकेची असल्याचे परमबीर सिंह म्हणाले. 

पाटणाच्या एसपींना १४ दिवसांचे क्वारंटाईन 

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाटणाचे एसपी विनय तिवारी हे बिहारमधून मुंबईत आले. परंतु, बीएमसीने त्यांना क्वारंटाईन केले. यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी टिका करत जे झालं ते योग्य झालं नाही, असे म्हटले आहे. 

वाचा - सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन महाराष्ट्र, बिहारमध्ये राजकीय संघर्ष

सुशांत प्रकरण : बिहारहून मुंबईत आलेल्या एसपींना सक्तीने केलं क्वारंटाईन

'रियाला बनवला जातोय बळीचा बकरा, खरे गुन्हेगार मोकाट'

 

 "