Wed, Jun 03, 2020 01:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : मिलन सब-वे येथील एका गोदामाला भीषण आग

मुंबई : मिलन सब-वे येथील एका गोदामाला भीषण आग

Last Updated: Oct 10 2019 8:31AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

सांताक्रुझमधील मिलन सब-वे येथील एका गोदामाला बुधवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत तीन गोदामे जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या १० बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली. 

वडाळ्यात झोपडपट्टीला आग, सहा जण जखमी

बुधवारी रात्री वडाळा येथील गणेशनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली. या आगीत सहाजण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आग्रीपाडा येथे इमारतीला आग...

आग्रीपाडा येथील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने भीषण आग लागली. अग्निशमन दलाला ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.