१२५ वर्षानंतर माथेरानमध्ये फुलपाखरांचा महत्वपूर्ण अभ्यास

Last Updated: Aug 09 2020 10:21PM
Responsive image


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

छान किती दिसते फुलपाखरू, या वेलींवर फुलांबरोबर रोज किती हसते फुलपाखरू ही कविता लहानथोरांपासून सर्वांच्या तोंडी असते. मात्र आता फुलपाखरं केवळ फुलांवरच जगतात असे नाही तर त्यांची नाळ ही चिखलासोबतही असते. फुलपाखरू चिखलातून अन्न शोधते ही नवी माहिती माहिती आता समोर आली आहे. मुंबईतल्या दोन तरुण संशोधकांनी यावर संशोधन करून ही नवीन महत्वाची माहिती समोर आणली. इतकेच नाही तर विविध रंग, छटा, आकार असलेली फुलपाखरे बघण्यासाठी आता कोणता ऋतू निवडावा यासाठी एक 'रंगांचा कोड' वर संशोधन करून त्यांनी पुढे आणले आहे. माथेरान येथे 140 प्रकारची फुलपाखरे आढळल्याचेही माहिती त्यांनी समोर आणली.त्यामुळे 125 वर्षानंतर माथेरानमध्ये फुलपाखरांचा महत्वपूर्ण अभ्यास झाला असून याचे कौतुक केले जात आहे

मुंबईतल्या दोन संशोधकांनी माथेरानच्या जंगलात यासाठी तब्बल 8 वर्षे घालविली. त्यांच्या या संशोधनाची दखल एका आंतरराष्ट्रीय जर्नलने देखील घेतली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतील संशोधक मंदार सावंत, सोमय्या महाविद्यालयातील सागर सारंग या दोघांनी 2011 ते 2019 या काळात माथेरानमधील फुलपाखरांचा अभ्यास केला.

माथेरात मध्ये नेमकी कोणती फुलपाखरे आढळतात याविषयी ठोस शास्त्रीय अभ्यास झालेला नव्हता. 1894 मध्ये ब्रिटिश निसर्गप्रेमी बेथम याने थोडा अभ्यास केला. पण तो कमी होता. त्यानंतर या अभ्यासाला पुढे नेत मंदार आणि सागरने माथेरानच्या घाटमाथ्यावरील सहा भाग, रस्ता आणि रेल्वे मार्ग अभ्यासासाठी निवडले. त्यात त्यांना अनेक गोष्टी आढळल्या. 

फुलपाखरे ठराविक ऋतूनुसार आढळतात. तसेच ते ठराविक ऋतूत विशिष्ट कार्य करतात. हे बघण्यासाठी या संशोधकांनी रंगांचे कोड तयार केले. फुलपाखरांसाठी असा रंगांचा कोड करणारे ते पहिलेच संशोधक आहेत. त्यासाठी त्यांनी 15 रंग वापरले. तुम्ही माथेरानला फिरायला गेल्यावर या कोडचा वापर करून कोणती फुलपाखरं बघायला मिळतील याचा अंदाज करू शकता. 

फुलपाखरे फुलांवरच आढळतात असे यापूर्वी बोलले जात होते. मात्र ते चिखल, मेलेले प्राणी- पक्षी, सडलेली फळे, पक्ष्यांची माणसांची विष्ठा यावरही जगतात. अशी माहिती यातून समोर आली.  फुलपाखरे सामान्यतः वनस्पती, गवत यावर अंडी घालतात. तसेच चिखल म्हणजे दलदलीच्या प्रदेशात त्यांचे प्रमाण जास्त असते. माथेरान हे त्यांच्यासाठी अधिवासाचे एक महत्वाचे ठिकाण आहे. त्यामुळेच येथे तब्बल 140 प्रकारची फुलपाखरे आढळली. या अभ्यासात त्यांना काही अति दुर्मिळ फुलपाखरे आढळली.

 
मुंबई आढळणारी ऑरेंज टेल्ड आवलेट, ऑरेंज आवलेट किंवा डबल ब्रँडेड क्रो अशी फुलपाखरं दृष्टीस पडली. डबल ब्रँडेड क्रो हे फुलपाखरू तर  8 वर्षात केवळ एकदाच आढळले. यावरून माथेरांमधील निसर्ग संपदा वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे सिद्ध होते, असे मंदारने यांच्याकडून सांगण्यात आले.

पर्यटकांचा अधिवासाला धोका?  

पर्यटकांसाठी माथेरान आवडीचे ठिकाण आहे. पण हेच पर्यटक फुलपाखरांसाठी अडथळा ठरत आहेत. पर्यटकांनी फेकलेल्या कचऱ्यामुळे त्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.    

- मंदार सावंत, संशोधक, बीएनएचएस, मुंबई

कोरोना कहर : रेमडेसिवीरचा तुटवडा अन् आरोग्य क्षेत्रातील वास्तव


विराट-अनुष्काने मुंबईत पोहोचताच कोरोना विरुद्ध उघडली मोहिम 


धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी काढण्यात आलेले ओबीसीचे आरक्षण उच्च न्यायालयाने रद्द


रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कुप्यांचे वितरण पूर्ण; महाराष्ट्राला सर्वाधिक 11 लाख 56 हजार कुप्यांचा पुरवठा


धुळे : टोसीलीझुमॅबचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना पकडले


ठाकरे घरात बसून तर पवार फक्त बैठकाच घेतात; भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांची टीका


राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार वनराज भाटिया यांचे निधन


कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका; तुम्हाला 'या' गोष्टी माहीत आहेत का?


अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा अन् एम्सने केला तातडीने खुलासा!


तमिळनाडू : स्टॅलिन यांनी शपथ घेतल्या घेतल्या प्रत्येक कुटुंबाला ४ हजार कोरोना सहाय्यता निधी देण्याची केली घोषणा