मुंबई : संजय गडदे
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सोमवारपासून नाताळच्या मुहूर्तावर मुंबईमध्ये वातानुकूलित लोकल सेवा सुरू सुरू झाली. बोरिवली स्थानकातून सकाळी 10.30 वाजता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी झेंडा दाखवून खर्या अर्थाने मुंबईकरांची स्वप्नपूर्ती केली. त्यानंतर ही एसी लोकल चर्चगेटपर्यंत धावली. पश्चिम रेल्वेने प्रवास करणार्या मुंबईकरांना नाताळचे गिफ्ट भारतीय रेल्वेकडून मिळाले. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, खासदार किरीट सोमय्या यांच्यासह स्थानिक आमदार- खासदार यावेळी उपस्थित होते.
25 ते 29 डिसेंबरदरम्यान एसी लोकलच्या फेर्या प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहेत. तर 1 जानेवारीपासून 12 फेर्या दररोज चालवल्या जातील. यातील 8 फेर्या फास्ट, 3 सेमी फास्ट तर 1 फेरी स्लो असणार आहे. तर देखभालीच्या कामासाठी शनिवार आणि रविवार या दोन दिवशी लोकलला सुट्टी असेल. या एसी लोकलचे पहिल्या सहा महिन्यांसाठी किमान तिकीट 60 रुपये असून, कमाल तिकीट 205 रुपये इतके असणार आहे. यात जीएसटीचाही समावेश असेल. तसेच या लोकलसाठी आठवड्याचा आणि मासिक पासही उपलब्ध असेल. महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिकांसाठी या
लोकलमध्ये राखीव जागा आहेत. पहिला आणि बारावा डबा महिला प्रवाशांसाठी राखीव असेल. लोकलची एक फेरी महालक्ष्मी-बोरिवली दरम्यान होणार असून ही लोकल सर्व स्थानकांवर थांबेल. सध्या फर्स्ट क्लाससाठी असलेल्या रेल्वे भाड्याच्या 1.3 पट एसी लोकलचे तिकीट असणार आहे. 150 वर्षानंतर पहिल्यांदाच मुंबईत वातानुकूलित लोकल धावणार आहे.
या एसी लोकलचे डबे इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नईने बनवले असून एका रेकमध्ये 6,000 प्रवाशांना बसण्याची क्षमता आहे. नव्या एसी लोकलच्या डब्यांमध्ये ऑटोमेटिक डोअर, एलईडी लाईट्स, इमर्जन्सी टॉक-बॅक सिस्टीम, अत्याधुनिक सुरक्षाव्यवस्था असणार आहे. तसेच एसी यंत्रणा, एसीचा गारवाही पुरेसा असून, त्या जोडीला पंखे, ब्लोअर्सही पुरविण्यात आले आहेत.
असे असेल एसी लोकलचे तिकीट दरपत्रक
स्थानक तिकीट साप्ताहिक पंधरवडा मासिक
चर्चगेट-मुंबई सेंट्रल 60 रु. 285 रु. 430 रु. 570 रु.
चर्चगेट-दादर 85 रु. 445 रु. 630 रु. 820 रु.
चर्चगेट-वांद्रे 85 रु. 445 रु. 630 रु. 820 रु.
चर्चगेट- अंधेरी 125 रु. 655 रु. 945 रु. 1240 रु.
चर्चगेट-बोरिवली 165 रु. 855 रु. 1245 रु. 1640 रु.
चर्चगेट-भाईंदर 175 रु. 905 रु. 1325 रु. 1745 रु.
चर्चगेट-वसई 195 रु. 1035 रु. 1505 रु. 1975 रु.
चर्चगेट-विरार 205 रु. 1070 रु. 1555 रु. 2040 रु.
सोमवार ते शुक्रवारचे वेळापत्रक (केवळ 29 डिसेंबरपर्यंत)
चर्चगेट स. 9.30 वा. बोरिवली स. 10.17 वा.
चर्चगेट स. 11.15 वा. बोरिवली दु. 12.02 वा.
चर्चगेट दु. 1.16 बोरिवली दु. 1.57 वा.
बोरिवली स. 10.20 चर्चगेट स. 11.10 वा.
बोरिवली दु. 12.25 वा. चर्चगेट दु. 1.13 वा.
बोरिवली दु. 2.11 चर्चगेट दु. 3.11 वा.
1 जानेवारीपासूनचे एसी लोकलचे नियमित वेळापत्रक
महालक्ष्मी स. 6.58 वा., बोरिवली स. 7.50 वा.
चर्चगेट स. 8.54 वा., विरार दु. 10.13 वा.
चर्चगेट स. 11.50 वा., विरार दु. 1.05 वा.
चर्चगेट दु. 2.55 वा., विरार दु. सायं.12 वा.
चर्चगेट सायं. 5.49 वा., बोरिवली सायं. 6.41 वा.
चर्चगेट सायं. 7.49 वा., विरार रात्री. 9.15 वा.
बोरिवली स. 7.54 वा., चर्चगेट स. 8.50 वा.
विरार स. 10. 22 वा., चर्चगेट स. 11. 46 वा.
विरार दु. 1. 18 वा., चर्चगेट दु. 2. 44 वा.
विरार सायं. 4.22 वा., चर्चगेट सायं. 5.44 वा.
बोरिवली सायं. 6.54 वा., चर्चगेट सायं. 7.44 वा.
विरार रात्री. 9.24 वा., चर्चगेट रात्री. 9.48 वा.
परे फास्ट
1867 -वाफेवर चालणार्या पहिल्या उपनगरीय रेल्वे सेवेला सुरुवात
5/1/1928-महालक्ष्मी ते अंधेरी पहिली विद्युत ट्रेन
28/10/1986-दादर-विरार मार्गावर 12 डब्याची लोकल सेवेला सुरुवात
5/5/1992-पहिल्या उपनगरीय महिला ट्रेनला सुरुवात
12/11/2007-सिमेन्स रॅक असणारी 12 डब्याची लोकल सुरुवात
21/11/2009 -सिमेन्स रॅक असणारी 15 डब्याची लोकल सुरुवात
16/4/2013 -डहाणू साठी लोकल सुरुवात
18/3/2015 -पहिली बम्बार्डियर लोकल पश्चिम रेल्वे सेवेत दाखल
29/5/2015 -महिला डब्यात इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलेंस सिस्टीम सुरू25/12/2017-वातानुकूलित ईएमयू लोकल सेवेला सुरुवात
एसी लोकलच्या प्रत्येक डब्यात टीसी!
सेकंड क्लासच्या प्रवाशांना एसी लोकलमधून प्रवास करता येणार नाही. विनातिकिट किंवा सेकंड क्लासच्या तिकिटावर कुणी प्रवास करू नये म्हणून एसी लोकलच्या प्रत्येक कोचमध्ये टीसी असणार आहेत. 1 जानेवारीपासून या लोकलच्या विरार ते चर्चगेट अशा दिवसातून 12 फेर्या होणार आहेत. या लोकलचा विरार ते चर्चगेटचा सवलतीतील मासिक पास 2040 रुपये इतका असणार आहे. पहिल्या सहा महिन्यांसाठी या लोकलचं किमान तिकीट 65 रुपये तर कमाल तिकीत 205 रुपये असणार आहे.
आरामदायक प्रवासासाठी
ही एक लोकल मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्यात आल्यानंतर त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. अशा आणखी दहा लोकल ताफ्यात येतील. या दहांमधली पहिली लोकल येण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागेल, पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकूल जैन यांनी अशी सावध प्रतिक्रिया दिली.