Tue, Aug 11, 2020 21:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चंद्रकांत पाटलांना माझ्यावर पीएचडी करण्यासाठी १० ते १२ वर्षे लागतील : पवार 

चंद्रकांत पाटलांना माझ्यावर पीएचडी करण्यासाठी १० ते १२ वर्षे लागतील : पवार 

Last Updated: Feb 23 2020 1:39PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबई येथे एका कार्यक्रमात राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्‍तर देताना पवार यांनी माझ्यावर भाजपचे प्रदेशाक्ष चंद्रकांत पाटील यांना पीएचडी करायची असेल, तर त्‍यांना कमीत कमी १० ते १२ वर्षे लागतील, असा टोला लगावला. 

अधिक वाचा : मुलुंड : स्वप्ननगरीच्या तळ्यातील मगर पकण्यात यश (video)

मुंबईमध्ये युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध महाविद्यालयातून आलेल्‍या विद्यार्थ्यांनी शरद पवार यांना अनेक प्रश्न विचारले. यावेळी पवार यांनीही आपल्‍या खुमासदार शैलीत प्रश्नांची उत्‍तरे दिली. यावेळी एकाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तुमच्यावर पीएचडी करणार असल्‍याचे वक्‍तव्य केल्‍याचे सांगितले. यावर पवार यांनी आपल्‍या शैलीत उत्‍तर देताना पाटील यांना माझ्यावर पीएचडी करायची असेल तर १० ते १२ वर्षे लागतील, असा टोला हाणला. यामुळे उपस्‍थितांमध्ये हास्‍यकल्‍लोळ माजला. 

अधिक वाचा : ट्रम्प जेवणार सोन्याच्या ताटात!

यावेळी पवार यांनी अनेक प्रश्नांची उत्‍तरे दिली. मी शालेय जीवनात अभ्‍यास सोडून अनेक विषयात पारंगत होतो. निश्यच केला तर सर्व काही मिळवता येते. मी २६ व्या वर्षी विधानसभेत निवडून आलोय आणि सध्या माझे वय ८० झाले आहे तरीही माझे मन तरूणचं असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.