Fri, Oct 30, 2020 18:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एकाच दिवशी उच्चांकी २० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण!

एकाच दिवशी उच्चांकी २० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण!

Last Updated: Jul 03 2020 1:41PM

File Photo 

 

 

 

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा आलेख कमालीचा वाढत असल्याचे दिसून येत आहे. पंरतु, कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाटाने वाढ नोंदवण्यात आली आहे. देशातील कोरोना संकटकाळात पहिल्यांदाच एकाच दिवसात २० हजारांहून अधिक कोरोनामुक्त रुग्णांना विविध रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. चिंताजनक बाब म्हणजे शुक्रवारी सकाळपर्यंत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आतापर्यंतची उच्चांकी भर पडली आहे. एका दिवसात २१ हजारांच्या घरात कोरोनाबाधित आढळल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.

वाचा : वाचा : मोठी बातमी : कोरोनावरील लसीचे १५ ऑगस्टला लॉचिंग; क्लिनिकल ट्रायल सुरु

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळपर्यंत २० हजार ९०३ कोरोनाग्रस्त आढळून आले, तर ३७९ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या त्यामुळे ६ लाख २५ हजार ५४४ झाली आहे. यातील २ लाख २७ हजार ४३९ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सक्रिय रुग्णसंख्या ४९२ ने वाढली आहे. आतापर्यंत देशातील ३ लाख ७९ हजार ८९२ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. गुरुवारी २० हजार ३२ कोरोनामुक्त नागरिकांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. देशात १८ हजार २१३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगातील ४.८७ टक्के मृत्यूदराच्या तुलनेत देशाचा मृत्यूदर २.९१ टक्के नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर ४.३८ टक्के आहे. राज्यातील  सर्वाधिक कोरोनाबाधित हे ३१ ते ४० वयोगटातील असून त्यांची संख्या ३५ हजार ५१४ (१९.४२ टक्के)  आहे. तर, सर्वात कमी कोरोनाग्रस्त ९१ ते १०० (०.१३ टक्के) तसेच ८१ ते ९० वर्ष (१.१८ टक्के) वयोगटातील आहेत. 

भारताचा कोरोनामुक्तीचा दर ६०.७३ टक्के झाला आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनामुक्तीच्या दरात सुधारणा दिसून आली असून तो ५५ ते ६० टक्क्यांच्या घरात नोंदवण्यात आला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाप्रभावित महाराष्ट्रासह (६,३३०), तामिळनाडू (४,३४३), दिल्ली (२,३७३), तेलंगणा (१,२१३), कर्नाटक (१,५०२), आंधप्रदेश (८४५), उत्तरप्रदेश (७६९), पश्चिम बंगालमध्ये (६४९) सर्वाधिक कोरोनाबाधित आढळून आले. या राज्यांच्या खालोखाल गुजरात (६८१), राजस्थान (३५०), हरियाणा (५६८), मध्यप्रदेश (२४५), आसाम (४३१), जम्मू-काश्मीर (१५४) तसेच केरळमध्ये (१६०) कोरोनाबाधितांची संख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे.

वाचा : देशात कोरोनाची दुसरी लस तयार, लवकरच क्लिनिकल ट्रायल
 
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) गुरुवारी विक्रमी २ लाख ४१ हजार ५७६ नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. आतापर्यंत आयसीएमआर ने देशातील ९२ लाख ९७ हजार ७४९ नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या आहेत. देशातील कोरोना संशयितांच्या तपासण्यांसाठी प्रयोगशाळांच्या संख्येतही गेल्या दोन महिन्यांमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. आयसीएमआरकडून लवकरच दिवसाला तीन लाख वैद्यकीय तपासण्या करण्याचे लक्ष गाठले जाईल, असा विश्वास मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.  

कोरोनामुक्तीचा दर सर्वाधिक असलेले राज्य 
   राज्य      कोरोनामुक्त   एकूण रुग्ण 
१) उत्तराखंड      २,४०५          २,९८४ 
२) राजस्थान      १४,९४८        १८,६६२
३) त्रिपुरा           १,१४६          १,४३५
४) छत्तीसगड     २,३८५          ३,०१३ 
५) झारखंड        १,९८३          २,५८४
६) मध्यप्रदेश     १०,८१५         १४,१०६ 
७) बिहार          ८,०२०          १०,४७१ 
८) ओडिशा       ५,५०२          ७,५४५
९) गुजरात       २४,५९३         ३३,९१३

सर्वाधिक सक्रिय कोरोनाबाधित असलेले राज्य 
  राज्य            सक्रिय रुग्ण
१) महाराष्ट्र          ७७,२७६
२) तामिळनाडू     ४१,०५० 
३) दिल्ली            २६,३०४ 
४) कर्नाटक         ९,४१० 
५) तेलंगणा          ९,२२६
६) आधंप्रदेश       ८,५८६  
७) गुजरात          ७,४३४    
 

 "