Fri, Oct 30, 2020 19:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोनिकाला मिळाले दोन्ही हात

मोनिकाला मिळाले दोन्ही हात

Last Updated: Sep 27 2020 1:54AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कुर्ला येथे राहणार्‍या 24 वर्षीय मोनिका मोरेला 4 आठवड्यानंतर मुंबईतील ग्लोबल रुग्णालयातून शनिवारी डिस्चार्ज देण्यात  आला. 28  ऑगस्ट  रोजी  झालेल्या 16 तासाच्या दोन्ही  हातांच्या   यशस्वी प्रत्यारोपण  शस्त्रक्रियेनंतर  चांगली  सुधारणा  झाली  आहे.  सहा  वर्षानंतर  पुन्हा  स्वत...च्या  हातावर जगण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र दरमहिन्याला  औषधांसाठी  15  ते  20  हजार  खर्च होणार असून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. माझ्या वडिलांचे स्वप्न त्यांच्या मृत्यूनंतर ग्लोबल रुग्णालयामुळे पूर्ण झाले असेे सांगताना मोनिकाच्या भावना दाटून आल्या. 2014च्या  रेल्वे  अपघातात  मोनिकाने दोन्ही हात  गमावले. तिने कृत्रिम  हातांच्या  सहाय्याने जगण्याचा प्रयत्न काही महिने केला. पण या हातांचा भार जाणवू लागला. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तिने मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात दोन्ही हात प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली. तिचे वडील या प्रत्यारोपणासाठी पैसे जमवू लागले. याच  दरम्यान  त्यांचा  मृत्यू  झाला.

हाताच्या प्रत्यारोपणाबद्दल जनजागृती नसल्याने मोनिकाला अवयवदात्यांकडून हात उपलब्ध होत नव्हते. अखेर चेन्नईतील 32 वर्षीय मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या   अवयवदानामुळे   मोनिकाला नवे हात मिळाले. चॉर्टड विमानाने हे हात मुंबईत आणण्यात आले. 28 ऑगस्टला रात्री  उशिरा  प्रत्यारोपण  शस्त्रक्रियेला  सुरुवात  करण्यात आली होती. साधारणत... 16 तास ही शस्त्रक्रिया  सुरू  होती.  ही  शस्त्रक्रिया  यशस्वी  झाली  असून  मोनिकाला  शनिवारी  डिस्चार्ज  देण्यात आला आहे.

मुंबईतील ग्लोबल रुग्णालयातील कन्सल्टंट प्लॅस्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह  मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सातभाई म्हणाले की, प्रत्यारोपणाच्या  तिसर्‍या  दिवशी  ती  आपल्या  खांद्याचा आधार घेऊन चालू व बसू लागली. दिवसातून  दोनदा  तिला  फिजिओथेरपी  दिली  जात होती. हातांच्या हाडांना आधार मिळावा, यासाठी   हाताच्या   कोपर्‍यापर्यंत   प्लास्टर   करण्यात आले. हाताच्या प्रत्यारोपणासाठी 36 लाख खर्च झाले असून अनेकांनी यासाठी मदत केली आहे.अन्य प्रत्यारोपण आणि हाताचे प्रत्यारोपण यात फरक आहे. फुफ्फुसे, किडन्या, लिव्हरचे प्रत्यारोपण  केल्यानंतर  तातडींने  हे  अवयव  अ‍ॅक्टिव्ह  होतात.  प्रत्यारोपण  केलेला  हात  कार्यरत होण्यास मात्र खूप वेळ लागतो. येत्या काही  आठवड्यांत  तिला  कोपर  हलवायला  सांगितले जाणार आहे. हात आणि बोटांनी 3-4 महिन्यांनंतर हालचाल सुरू होणे अपेक्षित आहे.तिच्या  हाताचा  स्नायूतील  टिशू  आणि  हाड  तोपर्यत  बरे  होण्याची  शक्यता  डॉक्टर  व्यक्त  करत आहेत.

 "