Sat, Nov 28, 2020 18:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्वच्छतेचे धडे देणार्‍या मंत्रालयाचे झाले ‘डम्पिंग’

स्वच्छतेचे धडे देणार्‍या मंत्रालयाचे झाले ‘डम्पिंग’

Last Updated: Feb 15 2020 1:58AM
मुंबई : चंदन शिरवाळे
राज्यात स्वच्छता राखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना धडे देणार्‍या राज्य सरकारच्या बुडाखाली अंधार असल्याचे उघड झाले आहे. मंत्रालयातील विविध दालनांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या नूतनीकरण व दुरूस्तीच्या कामाचा कचरा तत्काळ उचलून नेण्याऐवजी मंत्रालय इमारतीच्या परिसरात टाकण्यात आला आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना दालन आणि शासकीय निवासस्थानांचे वाटप करण्यात आले आहे. निवासस्थानांची डागडूजी करण्याऐवजी तेथे मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यावर 15 कोटी रुपए खर्च झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. हा सर्व अनावश्यक खर्च होता. पण मंत्र्यांची इच्छा भागविन्यासाठी खर्च करावा लागल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.
निवासस्थानांच्या दुरुस्ती पाठोपाठ मंत्री दालने चकाचक करण्यावर भर देण्यात आला आहे. युती सरकारमधील मंत्र्यांनी वापरलेल्या अनेक खुर्च्या आणि फर्निचर चांगल्या स्थितिमध्ये असतांना महायुतीच्या मंत्र्यांनी त्याला नापसंती दिली आहे. मात्र बहुतांश मंत्र्यांनी दालानामधिल भिंतींचे रंग, लोखंडी खुर्च्या, टेबल आणि कपाटांचीही दुरावस्था झाली असल्याचे सांगून आप-आपल्या दालनाच्या रंगरंगोटी वर भर दिला आहे. जुने फर्निचर बदलून तेथे नवीन फर्निचर तसेच खुर्च्या आणल्या आहेत.

सध्या या दालनांमध्ये दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच काही नवीन कामांनाही हात घातला आहे. काही मंत्र्यांनी आपल्या दालनाचा लूक बदलण्यासाठी प्लायवुडचा वापर केला आहे. ही कामे करण्यासाठी सुतारी अवजारांचा खणखणाट प्रत्येक मजल्यावर घुमत आहे. या कामनवार कामांवरही लाखो रुपये खर्च होत असल्याचे या अधिकार्‍यांनी सांगितले.

दालन वितरण झाल्यापासुन तेथे विविध कामे सुरु आहेत. पण या कामांचा लाकडी कचरा, मोडलेले फर्नीचर आणि भंगार अनेक दिवसांपासून मंत्रालय इमारत परिसरात पडून आहे. मंत्रालयात येणारे अभ्यागत आणि परदेशी शिष्टमंडळ हा कचरा पाहुन राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाड़े काढत आहेत.