Mon, Aug 03, 2020 15:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्री नवाब मलिक यांच्या भावाची कामगारांना मारहाण

नवाब मलिकांच्या भावाची कामगारांना मारहाण

Last Updated: Jan 15 2020 1:46AM
कुर्ला : वार्ताहर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केल्याचा व्हीडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या व्हायरल झाला. यामुळे कप्तान मलिकांवर टीकेची झोड उठली आहे. हा व्हिडीओ एक महिना पूर्वीचा आहे. 

महिनाभरापूर्वी लाल बहादूर शास्त्री मार्गावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असताना 4 खासगी कामगार रस्त्याच्या खालून जाणार्‍या प्लास्टिकच्या वाहिन्यांमधून विविध वायर्स टाकण्याचा काम करीत होते. एक दिवस अगोदर कप्तान मलिक यांनी या कामगारांना याबाबत पालिकेची परवानगी विचारत काम बंद करण्यास सांगितले होते. तेव्हा त्यांनी कामबंद पाडले होते. मात्र, दुसर्‍या दिवशी पुन्हा या कामगारांनी कामाला सुरुवात केली.

दुसर्‍या दिवशी पुन्हा कामगार काम करीत असताना पाहताच कप्तान मलिक यांना तिथे जाऊन कामगारांना मारहाण,  शिवीगाळ करत काम थांबवले. याचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे.

याबाबत कप्तान मलिक यांना विचारले असता त्यांनी हे कामगार पालिकेचा महसूल बुडवित होते. त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यांना परवानगी घेण्यास सांगितली असतानाही त्यांनी विना परवानगी काम सुरूच ठेवल्याने मारहाण केली. जर मी चुकीचा असेल तर त्यांना मी माझी तक्रार करण्यास ही सांगितले होते. त्यांनी मनमानी करीत हे काम सुरूच ठेवल्याने मला अखेर हे पाऊल उचलावे लागले, असे ते म्हणाले.