Fri, Oct 30, 2020 06:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'आम्हाला महाराष्ट्रात जेवायला मिळाले पण उत्तर प्रदेशात काहीच नाही'

'आम्हाला महाराष्ट्रात जेवायला मिळाले पण उत्तर प्रदेशात काहीच नाही'

Last Updated: May 23 2020 4:08PM
लखनऊ : पुढारी ऑनलाईन 

लॉकडाऊनमध्ये सर्वांधिक दैना विस्थापित मजूरांची झाली आहे. पहिल्यांदा त्यांना घरी जाण्यासाठी संघर्ष करावा लागला. आता त्यांना अनेक अडचणीच्या शर्यतीनंतर रेल्वेची सोय झाली. मजूरांना पाठवण्यासाठी श्रमिक एक्स्प्रेस धावत असल्या, तरी त्यांना सिग्नलसाठी तब्बल १०-१० तास थांबावे लागत आहे. त्यामुळे मजुरांचा उद्रेक झाला आहे. अनेक मजुरांनी ट्रॅकवर उतरून ट्रॅक बंद केला. 

अधिक वाचा : सोनिया गांधींनी बोलावलेल्या बैठकीत विरोधकांचा केंद्र सरकारवर निशाणा; शरद पवार म्हणाले... 

रेल्वे जाण्यास विलंब, रेल्वेत कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही, पाणी नाही, खराब दर्जाचे अन्न दिले जात आहे, अशा विविध तक्रारी मजूरांनी केल्या. आंध्रातील विशाखापट्टणम येथून बिहारकडे चाललेल्या श्रमिक एक्स्प्रेसमधील मजुरांनी तक्रारींचा पाढाच वाचला. यावेळी मजुरांनी मुख्यमंत्री नीतीशकुमार यांच्याविरोधात घोषणा दिल्या. 

अधिक वाचा : अन् गाढवाची भेट घेतल्यानंतर मालकाचे डोळे पाणावले

दीन दयाल उपाध्याय रेल्वे जंक्शनच्या बाहेर रेल्वे सिग्नलासाठी तब्बल १० तास होऊनही न मिळाल्याने मजूर चांगलेच संतापले. मजूरांनी व्यथा मांडताना सांगितले की, ट्रेन रात्री ११ वाजता येथे आली असून आणि अजून सिग्नल मिळालेला नाही. आम्ही १० तासांपासून अडकून आहोत. प्रवासासाठी १५०० रुपये मोजले आहेत, अशी तक्रार धीरेन राय या मजुराने केली. पनवेलहून उत्तर प्रदेशातील जौनपूरकडे सुटलेल्या श्रमिक एक्स्प्रेसमध्येही असाच प्रकार घडला. एक्स्प्रेसला सिग्नलसाठी तब्बल १० तास वाट पाहावी लागली.  

संतापलेल्या मजुरांनी त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर ठिय्या मांडला. त्यांनी समोरून रेल्वे येत असतानाही बाजूला होण्यास नकार दिला. त्यामुळे रेल्वे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर प्रत्येकाला जेवणाची सोय करण्यात आली. त्यानंतर रेल्वे गंतव्य स्थानासाठी रवाना झाली. आम्हाला महाराष्ट्रात जेवण मिळाले, पण उत्तर प्रदेशात काहीच मिळाले नाही. काशीमध्ये रेल्वे सात थांबली. त्यानंतर रवाना झाली, पण पुन्हा दोन तासासाठी थांबली. त्यानंतर कशीबशी पुढे गेली आणि पुन्हा थांबल्याचे गोविंद कुमार राजभर या प्रवाशाने सांगितले. 

अधिक वाचा : कराची विमान दुर्घटना; विमान कोसळण्यापूर्वी पायलटचे 'ते' अखेरचे शब्द...  

शुक्रवारी सायंकाळी गुजरातमधून बिहारला चाललेल्या मजुरांनी त्यांना जे जेवण देण्यात आले होते ते फेकून देण्याची घटना घडली. ते जेवण दर्जाहीन असल्याचा आरोप मजुरांनी केला. कानपूरमध्येही मजुरांना अमानवी वागणूक मिळत असल्याचा आरोप केला. शौचालयात पाणी नाही, पिण्यासाठी पाणी  नाही. चार ते पाच दिवसांपूर्वी तयार  केलेल्या पुऱ्या (ज्या कडक झाल्या होत्या) आम्हाला देण्यात आल्या. त्यामुळेच त्या पुऱ्या फेकून दिल्याचे एका प्रवाशाने कानपूरमध्ये सांगितले. उन्नावमधूनही अशाच घटना समोर आल्या. उत्तर प्रदेशात आतापर्यंत ९३० श्रमिक एक्स्प्रेसमधून १२.३३ लाख मजूर परतले आहेत. 

 "