Mon, Sep 21, 2020 11:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे-पालघरमध्ये मलेरिया-डेंग्यूचे थैमान

ठाणे-पालघरमध्ये मलेरिया-डेंग्यूचे थैमान

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 10 2018 12:23AMनवी मुंबई: राजेंद्र पाटील 

पावसाळा सुरु होताच साथीच्या आजारांनी थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत गेल्या महिन्याभरात मलेरिया, डेंग्यूच्या आजाराने खाजगी व सरकारी रुग्णालयात रुग्णांची उपचारासाठी गर्दी झाली आहे. या तीन जिल्ह्यांत सहा महिन्यांत मलेरियाचे 773 तर डेंग्यूचे 62 रुग्न आढळले. तर जून व जुलै आतापर्यंत मलेरियाचे 265 रुग्ण आढळून आले असून 34 रुग्ण हे डेंग्यूचे संशयीत मिळून आले आहेत. तर नवी मुंबईत 1 ते 9 जुलैपर्यंत 19 डेंग्यूचे संशयीत रुग्ण मिळून आले. 

आरोग्य विभागाचे सहायक संचालक मुंबई मंडळ ठाणे यांच्या कार्यालयातील सुत्रांनी दिलेल्या  माहितीनुसार जून आणि जूलै महिन्यांत साथीच्या रोगांवर मात करण्यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना केल्याची माहिती दिली. मात्र असे असले तरी ठाणे जिल्ह्यांत सहा महिन्यांत मलेरियाचे 525  तर डेंग्यूचे 10, रायगड मध्ये मलेरिया 120 तर डेंग्यूचे 6 आणि पालघर जिल्ह्यांत मलेरियाचे 88 तर डेंग्यूचे 56 रुग्ण मिळून आले. 

सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण हे पालघर जिल्ह्यांत मिळून आले. पावसाळा सुरु होताच जून आणि जुलैमध्ये डेंग्यूचे पालघरमध्ये 9 रुग्ण तर मलेरियाचे 38 रुग्ण आढळले. ठाणे जिल्ह्यांत मलेरियाचे 180 आणि डेंग्यूचे सहा तर रायगडमध्ये मलेरियाचे 44 रुग्न आढळून आले. हे सर्व रुग्ण सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत.