Fri, Oct 30, 2020 18:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राजभवनात कोरोनाची एन्ट्री; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केला स्पष्ट खुलासा!

राजभवनात कोरोनाची एन्ट्री; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केला स्पष्ट खुलासा!

Last Updated: Jul 12 2020 3:53PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी ऑनलाईन 

आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. करोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहोत, अशी माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ट्विट करून दिली आहे. 

अधिक वाचा : आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून ऐश्वर्या राय बच्चनबाबतचे 'ते' ट्विट काही मिनिटांमध्येच डिलीट!

दिवसेंदिवस राज्यातील करोना बाधितांचा आकडा वाढत आहे. आज (ता.१२) राजभवनातील जवळपास १८ जणांना करोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःला विलगीकरण केल्याची माहिती समोर आली होती. तथापि राज्यपालांनी आता ट्विट करून विलगीकरणमध्ये नसल्याचे म्हटले आहे.

अधिक वाचा : ब्रेकिंग! बच्चन घराण्यात कोरोनाचा शिरकाव; ऐश्वर्या आणि मुलगी आराध्याही पॉझिटिव्ह

राज्यपालांचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या राजभवनातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी १८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने चाचणी करण्यात आली आहे, अशी माहिती एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिली होती. 

अधिक वाचा : शरद पवारांची ‘ती’ मुलाखत म्हणजे ‘मॅच फिक्सिंग’

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (दि. ११) दिवसभरात राज्यात ८ हजार १३९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांचा आकडा २ लाख ४६ हजार ६०० वर पोहचला आहे. तर त्यापैकी राज्यात १ लाख ३६ हजार ९८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या ९९ हजार २०२ रूग्णांवर उपचार सुरू आहे.  

अधिक वाचा : 'नया है वह' म्‍हणत फडणवीसांचे आदित्‍य ठाकरेंना प्रत्‍युत्‍तर 

 "