Thu, Jul 02, 2020 17:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर संजय राऊत म्हणतात..

मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर संजय राऊत म्हणतात..

Last Updated: Mar 09 2020 4:58PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

मनसेने आज आपल्या १४ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने शॅडो कॅबिनेटची स्थापना केली. मनसे नेते राज्यातील मंत्र्याच्या कामकाजावर शॅडो कॅबिनेट मार्फत करडी नरज ठेवणार आहेत. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना याबाबतची प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी मनसेला शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा : मनसेचे 'असे' असणार शॅडो कॅबिनेट; अमित ठाकरेंनाही मिळाल्या दोन मोठ्या जबाबदाऱ्या!

संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांना मनसेने स्थापन केलेल्या शॅडो कॅबिनेटबाबत मत विचारण्यात आले. यावेळी राऊत म्हणाले की, एखादा राजकीय पक्ष त्यांच्या ध्येय, धोरण आणि विचारांवर चालत असतो. मनसेही राजकीय पक्ष असून तो त्यांच्या विचाराप्रमाणे चालत आहे. एखाद्या दुसऱ्या राजकीय पक्षाला आपण सल्ला देणं हे मला योग्य वाटत नाही. पण, आपला संस्कार आणि संस्कृतीप्रमाणे मी ही त्यांच्या या वाटचाली बद्दल त्यांना शुभेच्छा देतो. 

अधिक वाचा : 'लोकांना आमच्याकडून अपेक्षा, पण मतदान आम्हाला नाही करणार याला काय अर्थ'?

राऊत यांना यावेळी शरद पवार यांच्या भेटीबाबत विचारण्यात आले. यावेळी त्यांनी शरद पवार महाविकास आघाडीचे नेते आहेत. मी नेहमी त्यांची भेट घेत असतो. तसेच सुप्रिया सुळे यांनाही मी वेळोवेळी भेटत असतो. राज्यसभेच्या जागेसंदर्भात आमची ही भेट होती असे सांगितले.

अधिक वाचा : संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

महाविकास आघाडी एकत्रित राज्यसभेच्या जागा लढवणार आहे. याबाबत शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली आहे. राज्यसभेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची अधिक मते आहेत. तशी काँग्रेसचीही मते आहेत. दोन जागा या राष्ट्रवादी लढवणार आहे. यापैकी एका जागेवर स्वत: शरद पवार लढणार आहेत. तसेच दुसऱ्या जागेसाठी फौजिया खान लढणार असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले आहे. 

अधिक वाचा : आदित्य ठाकरेंच्या खात्यावर अमित ठाकरे ठेवणार नजर