Thu, Jan 28, 2021 08:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अखेर ठरलं, विधानसभेला मनसे 'इंजिन' धडाडणार!

अखेर ठरलं, विधानसभेला मनसे 'इंजिन' धडाडणार!

Published On: Sep 20 2019 4:00PM | Last Updated: Sep 20 2019 4:00PM

राज ठाकरेमुंबई : पुढारी ऑनलाईन

लोकसभेला आखाड्याच्या बाहेर राहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकहाती झंझावती प्रचार केला होता, पण त्याचा  अपेक्षित प्रतिसाद होऊ शकला नाही. दरम्यानच्या काळात राज ठाकरे शांतच राहिले. विधानसभा लढवणार की नाही? यावरून चर्चा रंगली होती, पण अखेर मनसे विधानसभा लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. 

आज (ता.२०) राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या  मनसे नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची सूत्रांनी माहिती दिली. दरम्यान, १०० पेक्षा जास्त जागा लढण्याची शक्यता आहे. आघाडीमध्ये नाहीतर स्वबळावर विधानसभा लढणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

मनसे मुंबई ,ठाणे, पुणे, नाशिक इत्यादी ठिकाणी ताकद असलेल्या शहरांमध्ये निवडणूक लढवणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रात्री किंवा उद्या सकाळी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. राज यांनी आजच्या बैठकीतून नेत्यांना दिली प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी वाटून दिली आहे.