Mon, Jan 18, 2021 16:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एमबीए सीईटीचा निकाल जाहीर

एमबीए सीईटीचा निकाल जाहीर

Last Updated: May 23 2020 11:43AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : प्रतिनिधी

राज्यभरातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल सीईटी सेल कक्षाच्या वतीने आज सकाळी जाहीर करण्यात आला आहे. शशांक चंद्रहास प्रभू हा विद्यार्थी१५९ गुण मिळवून पहिला आला आहे. त्याला ९९.९९ टक्के गुण प्राप्त झाले. या परीक्षेत केवळ ४ विद्यार्थ्यांना २०० पैकी १५० हून अधिक गुण मिळाले आहेत. तर १२६ ते १५० पर्यंत गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा ३९२ आहे.

वाचा :'पोलिस ठाण्याच्या चकरा मारतोय, आम्हाला बिहारला पाठवा'

गेल्या १४ आणि १५ मार्च रोजी राज्यातील १४८ केंद्रावर ही परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून १ लाख १० हजार ६३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख १० हजार ६३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ५१ ते १०० पर्यंत गुण मिळवणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अंकीत ठक्कर आहे. त्याला१५५ गुण आहेत. तर तिसऱ्या स्थानावर आकांक्षा श्रीवास्तव आहे. हिला १५३ गुण मिळाले आहेत.

सीईटी सेलच्या वतीने या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेली पहिलीची सीईटी परीक्षा सुरळीत पार पडल्यानंतर निकालही जाहीर करण्यात आले आहेत.  मुंबईसह राज्यातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीत असलेल्या महाविद्यालयांमध्ये सुमारे ३६ हजार ७६५ हजार जागा आहेत. या जागावर सीईटीत मिळालेल्या मेरिट गुणांनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.

सीईटीचे उतीर्ण विद्यार्थी

प्रात्प गुण          विद्यार्थी संख्या

१५१-१७५              ४

१२६-१५०             ३९२

१०१-१२५             ९२४

५१-१००              ५५००१

००-५०                ५१३१०

वाचा :#लॉकडाऊन: महाराष्ट्र सायबरकडून ४०७ गुन्हे दाखल, २१४ जणांना अटक