होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अनैतिक संबंधातून प्रेयसीची हत्या

अनैतिक संबंधातून प्रेयसीची हत्या

Published On: Sep 01 2018 2:08AM | Last Updated: Sep 01 2018 1:31AMडोंबिवली : वार्ताहर

गुंतवलेल्या रक्कमेचा परतावा न मिळाल्याने झालेल्या वादातून विवाहितेची हत्या करून तिचा मृतदेह घरात टाकून फरार झालेला आरोपी पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर या प्रकरणाला 24 तासांनी नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. अनैतिक संबंधातून या गुंतवणूकदार प्रियकराने गर्भवती प्रेयसीचा काटा काढल्याची धक्कादायक माहिती उजेडात आल्यानंतर तपास यंत्रणाही चक्रावली आहे. प्रेयसीला विष पाजून स्वतःही विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या या प्रियकरावर सध्या उपचार सुरू आहेत.

कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या पलावा सिटीतील अटलांटिका कासारियो येथे राहणारी हर्षदा सोमवंशी हिचे याच मार्गावरील निळजे गावातल्या लोढा हेवन येथील चंद्रेश निकेतन इमारतीमध्ये राहणार्‍या नितीन पाठरावे याच्याशी ओळख होती. हर्षदाच्या पतीच्या ओळखीतील व्यक्तीकडे नितीन याने एक लाख रुपये गुंतवले होते. मात्र सदर व्यक्ती पळून गेल्याने नितीनला गुंतवणुकीचा परतावा मिळू शकला नाही. त्यामुळे नितीनने हर्षदाकडे पैशांसाठी तगादा लावला. त्याबाबत दोघांमध्ये वाद होतेच, परंतु त्यांच्यामध्ये अनैतिक संबंधही होते व त्यातून ती गर्भवती होती. नितीन याने तिच्या पाठीमागे गर्भपात करण्यासाठीही लकडा लावला होता. तिने नकार दिल्याने त्याने तिला विष पाजले व घरी सोडून गेला होता.