Sun, Sep 20, 2020 06:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › क्रिकेटमध्ये करिअर करण्याची संधी न मिळाल्याने 'या' खेळाडूची आत्महत्या

क्रिकेटमध्ये करिअर करण्याची संधी न मिळाल्याने 'या' खेळाडूची आत्महत्या

Last Updated: Aug 12 2020 10:28AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबईच्या सिनिअर टीमचा गोलंदाज क्रिकेटपटू करण तिवारीने मालाड येथे त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना सोमवारी ११ ऑगस्टला रात्री घडली. त्यामुळे क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी क्रिकेटमध्ये करिअर करण्याची संधी न मिळाल्याने करण तिवारीने आत्महत्या केली असल्याची माहिती पुढे आली आहे.

करण तिवारीच्या मृत्यू प्रकरणाची कुरार पोलिस स्थानकात नोंद झाली आहे. त्याच्याजवळ कसल्याही प्रकारची सुसाइट नोट आढळून आलेली नाही. तो आपली आई आणि भावासोबत रहात होता. करणने राजस्थानातील आपल्या मित्राला फोन करुन आपली खेळासाठी निवड झाली नसून आपण निराश झाल्याचे सांगितले होते. आपल्याला जीवन संपवून टाकावेसे वाटते असेही तो आपल्या मित्राला म्हणाला होता. ही गोष्ट मित्राने करणच्या राजस्थानमधील बहिणीला सांगितली. बहिणीने तिच्या आईला याबाबत सांगितले होते. मात्र तोपर्यंत खूप उशिरा झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

करणने आपल्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला होता. आत्महत्येनंतर दरवाजा तोडला असता तो त्याच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला.   
स्थानिक क्रिकेटमध्ये 'ज्युनियर डेल स्टेन' म्हणून ओळखला जाणारा करण तिवारीने वयाच्या २७ व्या वर्षी मृत्यूला कवटाळले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

 "