Fri, Nov 27, 2020 11:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा करा

‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा करा

Last Updated: Nov 22 2020 2:43AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

‘लव्ह जिहाद’विरोधात महाराष्ट्रातही कायदा करावा, अशी मागणी भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शनिवारी केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लव्ह जिहादविरोधात कायदा आणणार असल्याचे म्हटले आहे. तर त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानही ‘लव्ह जिहाद’ कायदा आणण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही ठाकरे सरकारने ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा आणावा, अशी मागणी करून सोमय्या यांनी हा मुद्दा तापविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

दरम्यान, राज्य सरकार असा कोणताही कायदा आणणार नसल्याचे  मंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे. तर ‘लव्ह जिहाद’ हा केवळ भाजपचा अजेंडा आहे. लग्न हा विषय मुला- मुलींच्या वैयक्तिक पसंतीचा विषय आहे, अशा शब्दांत शिवसेना नेत्या व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली.

सेनेची हिंदुत्वावरून कोंडी 

अस्लम शेख ‘लव्ह जिहाद’वर जे बोलतात तीच भाषा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बोलत असल्याची टीका सोमय्यांनी केली. तर आमदार राम कदम म्हणाले की, सत्तेच्या लालसेपोटी शिवसेना गप्प आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या कायद्याचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, देशात ‘लव्ह जिहाद’ची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. भाजपची सत्ता नसलेल्या केरळनेही ही बाब मान्य केली आहे.