Sat, Sep 19, 2020 09:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रक्षाबंधननिमित्त लता दिदींच्या पंतप्रधान मोदींना शुभेच्छा; घेतलं 'हे' वचन!

रक्षाबंधननिमित्त लता दिदींच्या पंतप्रधान मोदींना शुभेच्छा; घेतलं 'हे' वचन!

Last Updated: Aug 03 2020 3:20PM
नवी दिल्ली/मुंबई: पुढारी ऑनलाईन

बहीण-भावाच्या पवित्र नात्यातील प्रेम वृद्धिंगत व दृढ करणारा रक्षाबंधन हा सण. देशभरात हा सण मोठ्या उत्सहात साजरा होत असला तरी कोरोनाच्या सावटामुळे आणि खबरदारीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक बहीण-भावांची भेट होऊ शकत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जण एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. यामध्ये  गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीदेखील आपला सहभाग नोंदवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष व्हिडिओ शेअर करत रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या काही मोजक्या फोटोंचा व्हिडिओ शेअर करत लतादिदींनी पंतप्रधान मोदींविषयी असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

काय म्हटले आहे लतादिदींनी

आज रक्षाबंधनाच्या शुभप्रसंगी माझा नमस्कार. आज मी तुम्हाला राखी पाठवू शकत नाही. त्यामागचे कारण सारे जग जाणतंय. नरेंद्र मोदी यांनी देशासाठी इतकी चांगली कामे केली आहे आणि इतक्या चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत ज्या कधीच कोणी विसरु शकत नाही. 

आज देशातील असंख्य बहिणी तुम्हाला राखी बांधण्यासाठी प्रयत्न करत असतील. मात्र ते अशक्य आहे. परंतु, तुम्ही समजू शकता आणि आजच्या दिवशी आम्हाला एक वचन द्या की तुम्ही देशाचं नाव अजून मोठे कराल. धन्यवाद”, अशी भावना ट्विट लतादिदींनी व्यक्त केली आहे. 

त्यांच्या या ट्विटला रिट्‍विट करत पंतप्रधान मोदी यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. लता दिदी, रक्षाबंधनाच्या शुभप्रसंगी तुम्ही दिलेला संदेश नक्कीच प्रेरणा देणारा आहे. देशातील बहिणींच्या आशीर्वादाने नक्कीच आपला देश यशाचं शिखर सर करेल आणि कायमच नवीन यश संपादित करेल, असे मोदी यांनी ट्विट करत विश्वास व्यक्त केला आहे. 

 "