Tue, May 26, 2020 14:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विनाअनुदानित गॅस सिलिंडर दरात 61.50 रुपये कपात

विनाअनुदानित गॅस सिलिंडर दरात 61.50 रुपये कपात

Last Updated: Apr 01 2020 9:14PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी विनाअनुदानित गॅस सिलिंडर दरात 61.50 रुपयांची कपात केली आहे. दर कपातीनंतर 14.2 किलो वजनाचा गॅस सिलिंडर दिल्लीच्या ग्राहकांना आता 744 रुपयांत मिळेल. मुंबईत विनाअनुदानित गॅस सिलिंडरची  किंमत 776.50 रुपयांवरून 714.50 रुपयांपर्यंत कमी झाली आहे.

मागील काही काळात जागतिक बाजारपेठेत कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या दरात मोठी घसरण झाली आहे. परिणामी विनाअनुदानित सिलिंडर दरात कपात केली जात असल्याचे  इंडियन ऑइलकडून सांगण्यात आले.  विशेष म्हणजे सलग दुसर्‍या महिन्यात विनाअनुदानित गॅस सिलेंडर दरात कपात करण्यात आली आहे.

याआधी फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलेंडर दरात वाढ करण्यात आली होती. त्यावेळी प्रति सिलिंडरमागे तब्बल 144.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती.