Sun, Jan 17, 2021 05:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भीमा कोरेगावचे राज्यात पडसाद; कोठे काय घडले?

भीमा कोरेगावचे राज्यात पडसाद; कोठे काय घडले?

Published On: Jan 02 2018 3:06PM | Last Updated: Jan 02 2018 3:25PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (१ जानेवारी) किरकोळ वादातून दोन गटांमध्ये दगडफेक आणि वादावादीचा प्रकार घडला होता.  त्याचे पर्यावसन गाड्यांची तोडफोड आणि दगडफेकीमध्ये झाले.भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला २०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने तेथे विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पुण्यातून काही तरुण जात होते. त्यावेळी दोन गट आमने-समाने आल्याने किरकोळ बाचाबाची झाली. पुढे त्याचे पडसाद दगडफेक आणि जाळपोळीत झाले. आज सकाळपासून या सर्व प्रकाराचे लोण राज्यात पसरले आहे. मुंबईसह, सोलापूर, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत. 


मुंबई : चेंबूर कॅम्‍प परिसरात ८ बेस्‍ट बससेसची तोडफोड करण्यात आली. चेंबूर नाका परिसरात तणावाचे वातावरण आहे. त्‍यामुळे येथील दुकाने बंद ठेवण्‍यात आली आहेत. 
पुणे : भीमा कोरेगाव येथे कालच्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर आज, तणावपूर्ण शांतता. 
सांगली : भीमा कोरेगाव येथील दगडफेक व वाहने जाळल्याच्या निषेधार्थ मिरज शहरात ५ एस. टी. गाड्या फोडण्यात आल्या आहेत. 
नाशिक : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने मनमाड शहरात बंदची हात.
सातारा : पंढरपूरहून-मुंबईला जाणाऱ्या एसटी बसवर फलटणजवळील जिंती नाका फलटण येथे दगडफेक.

संबंधित बातम्या : 

भाजपचे धोरण दलित विरोधी असल्याचे स्पष्ट : राहुल 

घटनेची चौकशी न्यायाधीशांमार्फत होणारः मुख्यमंत्री

भीमा कोरेगावप्रकरणी सामाजिक सलोखा राखावा : शरद पवार

शांतता आणि संयम राखा, अशोक चव्हाण यांचे आवाहन

भीमा-कोरेगाव हे सरकारचे अपयश : पृथ्वीराज चव्हाण

 

मराठवाडा
औरंगाबाद : शहरात कलम १४४ लागू; शहरातील अनेक महाविद्यालये, शाळा बंद
हिंगोली : बसस्थानकाजवळ दोन जीप जाळल्या. भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ वसमत बंदचे आवाहन.
जालना : जालना-सिंदखेड राजा मार्गावरील नंदापूर फाट्यावर बसवर दगडफेक.

कोठे काय झाले? 

भीमा कोरेगाव प्रकरण : मुंबईत हिंसक पडसाद(व्‍हिडिओ)

सांगलीः मिरजेत ५ एसटी गाड्या फोडल्या 

भीमा कोरेगाव प्रकरणी सातार्‍यात आरपीआयच्यावतीने मोर्चा 

फलटणमध्ये बसवर दगडफेक, एक गंभीर 

नगरः बसस्थानकाबाहेर १५ वाहनांच्या काचा फोडल्या

भीमा कोरेगाव प्रकरणाचे सोलापुरात पडसाद, बस पेटवली

भीमा कोरेगाव पडसाद, दुपारनंतर शाळांना सुट्टी 

भीमा कोरेगाव प्रकरणाचे उमरगा, कळंबमध्ये पडसाद

औरंगाबाद : दगडफेकीनंतर जमावबंदी लागू; ३ पोलिस जखमी 

भीमा कोरेगावप्रकरणी नाशिक बंद, रास्‍ता रोको