Thu, Aug 06, 2020 03:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विकास दुबेच्या दोन साथीदारांना मुंबईत बेड्या; महाराष्ट्र एटीएसची कारवाई

विकास दुबेच्या दोन साथीदारांना मुंबईत बेड्या; महाराष्ट्र एटीएसची कारवाई

Last Updated: Jul 11 2020 5:28PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी ऑनलाईन 

उत्तर प्रदेशमधील विकास दुबे या गुंडाने व त्याच्या साथीदारांनी ३ जुलैच्या मध्यरात्री ८ पोलिसांची हत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर विकास दुबे व त्याचे साथीदार फरार झाले होते. पोलिसांनी विकास दुबेसह त्याच्या साथीरांवर चौबेपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. सर्व आरोपींचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिस शोध घेत होते. या सर्व आरोपींना पकडण्यासाठी बक्षीसही पोलिसांनी जाहीर केले होते. 

वाचा : 'कोरोना हे १०० वर्षांतील आरोग्य, अर्थव्यवस्थेवरील सर्वांत मोठे संकट' 

या हत्याकाडांतील दोन आरोपी मुंबईत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथक जुहु युनिट दोन यांना मिळाली होती. हे आरोपी कानपूर केस मधील असल्याची खात्री झाली. यातील गुड्डन त्रिवेदी हा आरोपी मुंबई, ठाणे येथे लपन्यासाठी आल्याची माहिती मिळाली. 

प्र. पो.नि. दया नायक त्यांना मिळालेली माहिती वरिष्ठांना दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कोलशेत रोड ठाणे येथे द.वि.प. जुहु येथील अधिकाऱ्यांनी सापळा रचून उत्तर प्रदेशमधील हत्याकांडातील आरोपी गुड्डन त्रिवेदी व त्याचा वाहन चालक सोनु तिवारीला पकडले. या आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या चौकशीत त्या आरोपीने विकास दुबेने २००१ साली चौबेपूर पोलिस ठाण्यात केलेल्या तत्कालील मंत्री संतोष शुक्ला यांच्या खूनासह अनेक गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली. ही माहिती उत्तर प्रदेशमधील एटीएफ यांना देण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

ही कारवाई अप्पर पोलिस महासंचालक देवेन भारती यांच्या आदेशानूसार विषेश पोलिस महानिरिक्षक जयंत नाईकनवरे, पोलिस उपायुक्त विक्रम देशमाने, विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात झाली.  स.पो.आ. श्रीपाद काळे, यांच्या देखरेखेखाली जुहु युनिटचे प्रभारी पोलिस पोलिस निरिक्षक दया नायक , स.पो.नि. दशरथ विटकर, सचिन पाटील, सागर कुंजीर, व पोलिस पथकाने केली. 

वाचा : 'तुम्ही सरकारचे हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?', यावर शरद पवारांनी दिले 'हे' उत्तर