Wed, May 12, 2021 01:15
स्पष्टीकरण : कंगणाचं ट्विटर अकाऊंट का सस्पेंड झालं? केवळ एकच ट्विट कारण होतं का?

Last Updated: May 05 2021 2:25AM

पुढारी ऑनलाईन डेस्क

देशातील प्रत्येक (खासकरून राजकीय) घडामोडींवर सातत्याने वादग्रस्त भाष्य करणारी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री कंगणा राणावत हिचं ट्विटर अकाऊंट शेवटी कायमचं सस्पेंड करून टाकलं. या पूर्वीही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचंही असंच ट्विटर अकाऊंट सस्पेंड केलं. कंगणाच्या बाबतील बोलायचं झालं तर त्याचं कारण असं की, पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर तिथे हिंसाचार झाला आणि त्यात सुमारे १२ जणांचा मृत्यू झाला. 

नेहमीप्रमाणे ट्विटरवर व्यक्त होणारी बाॅलिवुडची वादग्रस्त क्विन कंगणाने म्हणाली की, "बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा. तेथील गुंडाराज नेस्तनाबूत करण्यासाठी आपल्या सुपर गुंडाराज करण्याची गरज आहे. मोदीजी, कृपया तुम्ही तुमचं विराट रूप दाखवा." हेच ट्विट कंगणाचं अकाऊंट बंद करण्यास कारणीभूत ठरलं. 

वाचा ः कोरोना : शाळांनी संवेदनशीलता दाखवून फी कमी करावी, सुप्रीम कोर्टाची सूचना

या ट्विटरवर #KanganaRanaut आणि #Suspended असा ट्रेण्ड सुरू झाला. कंगणानं केलेलं हे ट्विट ट्विटर प्रशासकांना नियमांच्या विरोधात जाणारं होतं. कारण, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारा पुष्टी देणारं हे ट्विट असल्याचा ठपका ट्विटरने कंगणावर ठेवला आहे. यावर ट्विटरने स्पष्टीकरण दिलेलं आहे की, "आम्ही हे स्पष्टपणे सांगितलं होतं की, एखाद्या ट्विटने हिंसाचाराला खतपाणी घातलं जात असेल तर त्यावर तातडीने कारवाई केली जाईल. समाजातील शांतता भंग करणारे ट्विट्स सतत येत असतील तर आम्ही ते अकाऊंट कायमचे सस्पेंड करतो. जो कोणी ट्विटर अकाऊंट वापरत असतो, त्या प्रत्येकासाठी आमचे नियम सारखे असतात. कायदेशीरदृष्ट्या आणि नि:पक्षपातीपणे आम्ही संबंधितांवर कारवाई करतो", असं स्पष्टीकरण ट्विटरने दिलं आहे. 

कंगणाच्या अकाऊंटवर ट्विटरने केलेली कारवाई अत्यंत महत्वाची आणि सर्वात कठोर कारवाई समजली जाते. कंगणाचं ट्विटर अकाऊंट हे जगाच्या दृष्टीपटलावरून सस्पेंड केलं असं नाही, तर कंगणाला पुन्हा ट्विटरवर अकाऊंट काढण्याची परवानगीदेखील नाही. याचा अर्थ स्पष्ट असा आहे की, कंगणाला पुन्हा ट्विटरवर येता येणार नाही. 

वाचा ः सुपरसॉनिक ‘तेजस’ची निर्मिती करणाऱ्या पद्मश्री मानस बिहारींचे निधन

ट्विटर असं म्हणतं आहे की, "जेव्हा ट्विटर एखाद्या वापरकर्त्याचे अकाऊंट कायमचे सस्पेंट करणारे असते, तेव्हा त्याची कल्पना वापरकर्त्यास देत असते आणि वापरकर्त्याकडून ट्विटरच्या कोणत्या नियमांचे उल्लंघन होत आहे, याचीही स्पष्ट कल्पना देत असते", याचा अर्थ असा आहे की, ट्विटरने कंगणाला पहिल्यांदा तिच्याकडून हिंसाचाराचं समर्थन केलं जातंय, तिच्याकडून समाजाचं शांती भंग होते आहे, याची कल्पनी दिलेली होती. मात्र, कंगणाने ट्विटरची सूचना आणि नियमांना न जुमानता लोकांना भडकविणारे ट्विट केले. 

कंगणाला या निर्णयाविरोधात अपील करता येता का? तर, याचं उ्त्तर आहे 'हो'. एखाद्या वापरकर्त्यावर ट्विटरने कठोर कारवाई केली असेल, तर संबंधिताला ट्विटरच्या सपोर्ट पेजवरून त्याची बाजू मांडता येते. म्हणजे काय तर, इंटरफेस प्लॅटफाॅर्मद्वारे किंवा निर्दोष असल्याचा मजकूर ट्विटरकडे पाठवून अपील करता येते. जर त्याची बाजू बरोबर असेल, तर ट्विटर त्याचे अकाऊंट पुन्हा चालू करण्याची शक्यता असते. मात्र, नियमांचा भंग केला असेल तर ते कायमस्वरुपी बंद केले जाते. 

वाचा ः लॉकडाऊन काळात ७५ लाख नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

कंगणाच्या बाबतीत ट्विटर इतरही सौम्य प्रकारची घेऊ शकली असते, पण तसं का केलं नाही. हा महत्वाचा प्रश्न उरतोच. एखादी आक्षेपार्ह किंवा अपमानास्पद ट्विट विशिष्ट देशापुरते लपविले असते किंवा ते जनतेपर्यंत पोहोचूच नये, यासाठी मर्यादा घालू शकले असते. मात्र, कंगणाचे पूर्वीच्या ट्विट्सचा सारासार विचार करून ही कारवाई करण्याचे ट्विटरने ठरवले. 

कंगणाचे ट्विटर अकाऊंट हे 'रिड ओन्ली मोड' प्लेस करू शकले असते. यामध्ये वापरकर्त्यावर ट्विट, रिट्विट किंवा ऑनलाईन काॅमेंट्सबाॅक्सवरून संवाद साधण्यास मर्यादा येतात. परंतु, यात एकमेकांना संदेश पाठवू शकतो, हादेखील पर्याय कंगणासमोर न ठेवता सरळ अकाऊंटस सस्पेंट करण्यासा निर्णय ट्विटरने घेतला. तसेच ज्या पद्धत्तीचं ट्विट करून नियमांचं उल्लंघन केलं आहे, त्यानुसार कठोर कारवाई करण्यापूर्वी सूचना दिल्यानंतर ट्विटरचं सपोर्ट पेज १० तासांपासून ते ७ दिवसांपर्यंतचा कालावधी वापरकर्त्याला देते. 

वाचा ः १८ ते ४४ वयोगटातील केवळ चार लाख लोकांचे लसीकरण

ट्विटरकडून बऱ्याचदा संबंधित ट्विटर अकाऊंट वापरकर्त्याकडून निनावी नसल्याची खात्री करून घेत असते. त्यासाठी ईमेल किंवा मोबाईल क्रमाकांची मागणी करत असते. या प्रक्रियेमागील हेतू ट्विटर सांगते की, "ट्विटर अकाऊंटचा वापर हा गैरवर्तनासाठी केला जात नाही. तसेच नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांनीही रोख बसविता येतो. आणि समजा त्यातून ट्विटर अकाऊंट काढून नियमांचं उल्लंघन केलं तर खाते सस्पेंड करण्याती कारवाई केली जाऊ शकते. 

ट्विटरचे इतके सगळे नियम पाहिल्यांनंतर आणि कंगणाची ट्विटरवरील वर्तवणूक पाहिल्यानंतर असं दिसतं की, कंगणाला नियम भंग केल्यासंदर्भात सातत्याने सूचना देण्यात आल्या होत्या, तसेच अकाऊंट सस्पेंड करण्याचाही इशारा दिला होता. तसेच तिला असंही सांगितलं होतं की, तुमचे ३० लाखांहून अधिक फाॅलोअर्स आहेत. त्यामुळे वारंवार इशारा देऊनही कंगणा तुच्छतादर्शक ट्विट करत राहिली. त्यात पश्चिम बंगालमधील हिंसाचारासंदर्भातील कंगाणाचे ट्विट पाहून अखेर ट्विटरला कठोर निर्यण घ्यावे लागले.