Wed, Sep 23, 2020 20:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › म्हणून शरद पवारच 'जाणता राजा'; आव्हाडांचे उदयनराजेंना प्रत्युत्तर

म्हणून शरद पवारच 'जाणता राजा'; आव्हाडांचे उदयनराजेंना प्रत्युत्तर

Last Updated: Jan 14 2020 4:13PM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून महाराष्ट्रात जोरदार वादंग सुरू आहे. दिल्लीतील भाजप नेते जय भगवान गोयल यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी भाजपवर जोरदार टीका करायला सुरूवात केली. याप्रकरणी भाजपने हात वर केले असून याच्याशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले.  याचबरोबर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना  जाणता राजा संबोधणाऱ्यावरही आक्षेप घेतला आहे. छत्रपतींचे वशंज उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली. या टीकेला कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा► पक्षाचे नाव ठेवताना वंशजांना विचारले होते का, उदयनराजेंचा सवाल

एक युगपुरुष जन्माला येतो, ते आमचे शिवाजी महाराज. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो, असे उदयनराजे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली. 

हे ही वाचा►जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराजच; उदयनराजेंचा टोला

उदयनराजेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना आव्हाड यांनी शरद पवार यांना जाणता राजा का संबोधले जाते यामागचे कारण सांगितले आहे. ''होय शरद पवार हे "जाणता राजा " आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न,औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न,स्त्रीयांचे प्रश्न अशा प्रश्नांची मालिका सांगा. सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. याबरोबरच सर्वांगीण विकासामध्ये सर्वाधिक वाटा पवारांकडे आहे. म्हणूनच पवार जाणता राजा आहेत. असे मत उदयनराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.

 "