भारताला ५ जी नेटवर्कसाठी जपानची मिळणार साथ!

Last Updated: Oct 30 2020 8:31PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

चीनच्या भारत विरोधात वाढत्या कारवाया लक्षात घेता जपान सोबतच्या मैत्रिपूर्ण संबंधांना अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. उभय देशांमधील समन्वयात सुधारणा होण्यासाठी माहिती तसेच दळवळण तंत्रज्ञान क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे.

केंद्राने कराराला हिरवा कंदील दाखवल्याने धोरण निश्चिती दरम्यान जापान हा विशेष सामरिक आणि जागतिक भागीदार म्हणून महत्वाचा देश असल्याने भारताला त्याचा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. उभय देशांमधील सामंजस्य करारामुळे ५ जी नेटवर्क, दूरसंचार सुरक्षा, सबमरीन केबल, दूरसंचार क्षेत्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचे प्रमाणिकरण आणि प्रमाणपत्र, अत्याधुनिक बिनतारी संदेश तंत्रज्ञान, आयसीटी क्षमता निर्माण करणे, सार्वजनिक संरक्षण, आपत्ती निवारण, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रामध्ये देशाला जपानकडून सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

जपानबरोबरच्या या सामंजस्य सहकार्य करारामुळे भारताला जागतिक स्तरावरच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक संधी मिळू शकतील. आयसीटी तंत्रज्ञान सहकार्यामुळे देशामध्ये आयसीटी पायाभूत सुविधा मजबूत होण्यास मदत मिळेल. नेटवर्क आणि तंत्रज्ञानाच्या सहकार्यामुळे देशातल्या दुर्गम भागाशी संपर्क साधणे शक्य होईल. आयसीटी क्षेत्रामध्ये मनुष्य बळ क्षमता निर्माणासाठी आणि स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासाला प्रोत्साहन देताना आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करणेही शक्य होणार आहे, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

दुखापतग्रस्त ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का, वॉर्नर 'आऊट'


उर्मिला मातोडकरांचा शिवसेना प्रवेश मुहूर्त ठरला! अखेर संजय राऊतांकडून शिक्कामोर्तब


airtel कडून ११ जीबी डेटा फ्री; 'असा' घ्या लाभ!


‘बिग बॉस’ फेम सई लोकूर विवाहबंधनात


दिवंगत संगीतकार वाजिद खानच्या पत्नीचा सासरच्या लोकांवर जबरदस्तीने धर्म परिवर्तनाचा आरोप


विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ईडीकडून पुन्हा समन्स बजावले जाण्याची शक्यता


त्रिपुरारी पौर्णिमा : ५१ हजार दिव्यांनी उजळले 'दगडूशेठ' गणपती मंदिर


भारतीय पोराकडून ऑस्ट्रेलियाच्या पोरगीला प्रपोज डायरेक्ट मैदानात (video)


आशिकी फेम अभिनेता राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोक, आयसीयूत दाखल 


दीपिका पादुकोणने एक्स बॉयफ्रेंडचे फोटोज शेअर केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या! (photos)