रविवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास राज्यपालांनी शिवसेनेला सत्तेचे निमंत्रण दिले आणि ते स्वीकारण्यासाठी चोवीस तासांची मुदत दिली. सोमवारी सकाळपासून मग सुरू झाला घड्याळाचा गजर. सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकाळीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ताज हॉटेलमध्ये भेट घेतली. येथून पुढे एक एक मिनिट मोजला जाऊ लागला. सोमवारचा दिवसभरातील राजकीय घटनाक्रम असा-
- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आपल्या निवडक पदाधिकार्यांसोबत सकाळपासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये खलबते.
- शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यात ताज लॅण्ड्स एन्ड हॉटेलमध्ये पाऊणतास चर्चा.
- शेतकर्यांची कर्जमाफी, युवकांना रोजगार इत्यादी अजेंडा घेऊन काम करणार असल्याचा निर्णय.
- उध्दव यांच्याकडून पवारांना सत्तास्थापनेसाठी पाठिंब्याबाबत प्रस्ताव.
- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील तर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते.
- ठाकरे भेटीनंतर पवार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत
- पवारांकडून दिल्लीतील हालचालीचा कानोसा. काँग्रेसच्या पत्राची वाट पाहण्याची भूमिका.
- राज्यपालांच्या पत्रानुसार सोमवारी संध्याकाळी 7 वाजता शिवसेना नेते राजभवनवर.कालावधी वाढवून देण्यास राज्यपालांचा नकार
- तिसर्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राज्यपालांकडून सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीला निमंत्रण. धनंजय मुंडे, जयंत पाटील राजभवनवर. राष्ट्रवादीलाही 24 तास.
- काँग्रेससोबत चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण