Mon, Oct 26, 2020 18:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दोन महिन्याच्या ब्रेकनंतर शार्दूल ठाकूर ॲक्टिव्ह मोडमध्ये! (video)

दोन महिन्याच्या ब्रेकनंतर शार्दूल ठाकूर ॲक्टिव्ह मोडमध्ये! (video)

Last Updated: May 23 2020 10:03PM

संग्रहित छायाचित्रमुंबई :पुढारी वृत्तसेवा

जलदगती गोलंदाज शार्दूल ठाकूरने कोरोना व्हायरसमुळे दोन महिन्याच्या ब्रेकनंतर आऊटडोर ट्रेनिंगला सुरुवात केली असे करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटर बनला आहे. भारतासाठी एक कसोटी, 11 एकदिवसीय आणि 15 टी 20 सामने खेळलेला शार्दूलने पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील स्थानिक मैदानावर काही खेळाडूंसह सराव सुरू केला.

महाराष्ट्र सरकारने ग्रीन आणि ऑरेंज क्षेत्र वगळता दर्शकांशिवाय वैयक्तिक सरावासाठी वैयक्तिक ट्रेनिंगसाठी स्टेडियम खोलण्याची परवानगी दिली आहे.पण, प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाण्यास मनाई केली. 31 मे पर्यंत वाढविण्यात आलेल्या चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही नियम शिथिल करण्यात आले.

आम्ही आज सराव केला. दोन महिन्यानंतर सराव करणे खरेच चांगले आहे. असे ठाकूर म्हणाला. पालघर डहाणू तालुका क्रीडा संघटनेने बोईसर येथे नेट सराव सुरू केला. जे मुंबईपासून 110 किमी दूर आहे. असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. ते पुढे म्हणाले की, सुरक्षेचे नियम पाळण्यात आले आहेत. गोलंदाजाना चेंडू मिळाला जो संक्रमण रहित करण्यात आला आणि जो खेळाडू सरावासाठी त्याचे तापमान तपासण्यात आले.

पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी खेळासंदर्भात नियम घोषित केल्यानंतर आमचे लक्ष नियमांचे पालन करून सराव सुरू करण्याकडे होते, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य अजिंक्य नाईक यांनी सांगितले.गेल्या सत्रात मुंबईकडून रणजी पदार्पण करणारा हार्दिक तामोरे देखील याच मैदानात सराव करताना दिसला. आघाडीचे क्रिकेटपटू विराट कोहली आणि रोहित शर्मा अजूनही वैयक्तिक सराव सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आपल्या फार्महाऊसवर ट्रेनिंग करत आहे.

 "