Thu, Aug 13, 2020 17:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एका दिवसात २६ हजारांवर रुग्ण; ४७५ जणांचा बळी

एका दिवसात ४७५ जणांचा बळी

Last Updated: Jul 10 2020 10:59AM

file photoनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशात कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. गेल्या २४ तासांत नवे २६ हजार ५०६ रुग्ण आढळून आले आहेत. तर ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात रुग्णसंख्येने २६ हजारांचा टप्पा पार केल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंतची एका दिवसातील ही उच्चांकी रुग्णसंख्या आहे.

वाचा : 'कोरोना महामारीने भारताची 'फार्मा ॲसेट' जगाला दाखवून दिली'

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण रुग्णसंख्या आता ७ लाख ९३ हजार ८०२ वर पोहोचली आहे. सध्या २ लाख ७६ हजार ६८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ४ लाख ९५ हजार ५१३ रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत २१ हजार ६०४ जणांचा मृत्यू झाला आहे.

वाचा : एन्काऊंटरचा थरार! पोलिसांची गाडी पलटी, पिस्तूल हिसकावून पळाला आणि खेळ खल्लास

तर जगातील कोरोना रुग्णसंख्या १ कोटी २३ लाखांवर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोनाने ५ लाख ५७ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७२ लाख २४ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेत रुग्णांची संख्या सर्वांधिक आहे. त्याचसोबत ब्राझील, भारत आणि रशियात मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत.