Wed, Sep 23, 2020 01:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशात कोरोनाचा कहर; नव्याने २२ हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रूग्ण

देशात एका दिवसात २२ हजारांहून अधिक रूग्ण

Last Updated: Jul 04 2020 10:33AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशात कोरोना महामारीचा विळखा दिवसागणिक आणखी घट्ट होत चालला आहे. गेल्या २४ तासांत २२ हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. पहिल्यांदाच गेल्या २४ तासांत कोरोना बाधितांच्या आकड्याने उच्चांक गाठला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत २२ हजार ७७१ नव्याने बाधित रूग्णांची नोंद झाली आहे. तर, ४४२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोना बाधितांचा आकडा ६ लाख ४८ हजार ३१५ वर पोहोचला आहे तर  आतापर्यंत १८ हजार ६५५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या, २ लाख ३५ हजार ४३३ जणांवर उपचार सुरू असून ३ लाख ९४ हजार २२७ जण पुर्णपणे बरे झाले आहेत. 

यासोबतच महाराष्ट्रात काल दिवसभरात, ६ हजार ३६४ कोरोनाबाधितांची नव्याने नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात बाधितांचा आकडा १ लाख ९२ हजार ९९० वर पोहोचला आहे.  तर गेल्या २४ तासांत ३ हजार ५१५ जण कोरोनामुक्त झाले आहे. 

राज्यात आतापर्यंत १ लाख ४ हजार ६८७ रूग्णांना डिस्‍चार्ज देण्यात आला असून सध्या  ७९ हजार ९११ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.  

 "