Sun, Sep 20, 2020 07:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशातील कोरोना संसर्ग उच्चांकी पातळीवर; एका दिवसात रुग्ण ६२ हजारांवर 

देशातील कोरोना संसर्ग उच्चांकी पातळीवर; एका दिवसात रुग्ण ६२ हजारांवर 

Last Updated: Aug 07 2020 10:55AM

File Photoनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

देशात कोरोना संसर्गाचा फैलाव सुरु झाल्यापासून आतापर्यंतची उच्चांकी रुग्णवाढ शुक्रवारी नोंदवण्यात आली आहे. गेल्या एका दिवसात तब्बल ६२ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची भर पडल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील कोरोनामुक्तीची दर वाढत असला, तरी सातत्याने होणारी रुग्णवाढ चिंतेत भर टाकणारी आहे. 

गेल्या आठवड्याभरात तीन लाखांहून अधिक कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. सलग नऊ दिवसांपासून ५० हजारांहून अधिक कोरोनारुग्ण आढळून येत असल्याने देशात कोरोना संसर्ग उच्चांकी पातळीवर पोहोचला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गत पाच दिवसात देशभरात २ लाख ७५ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची भर पडली, तर ४ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळीपर्यंत देशात ६२ हजार ५३८ कोरोनारुग्णांची भर पडली. तर, ८८६ रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी दिवसभरात ४९ हजार ७६९ रुग्णांनी कोरोनावर मा​त मिळवली. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे २० लाख २७ हजार ७४ एवढी झाली आहे. यातील १३ लाख ७८ हजार १०५ रुग्ण (६७.६२ टक्के) कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर, ६ लाख ७ हजार ३८४ रुग्णांवर (३०.३१ टक्के) देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत ४१ हजार ५८५ कोरोनारुग्णांचा (२.०७ टक्के) मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनामुक्तीचा दर आता ६७.९८ टक्के एवढा नोंदवण्यात आला आहे. 
 
देशात सर्वाधिक कोरोनाप्रभावित राज्य महाराष्ट्र असून राज्यात आतापर्यंत ४.६८ लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येपैकी एक चतुर्थांश कोरोनारुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रा पाठोपाठ तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकात कोरोनारुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ दिसून आली आहे. या चार राज्यांतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा विचार केलास देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी ५० टक्के कोरोनाबाधित येथे आहेत. दिल्ली तसेच उत्तर प्रदेशातील कोरोना रुग्णांची संख्यात त्यात समाविष्ठ केल्यास ६ राज्यांमध्ये हा आकडा ६७ टक्क्यांवर पोहोचला आहे. 

देशातील कोरोनाबाधितांची आकडेवारी (​शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत) 

एकूण कोरोनाबाधित - २०,२७,०७४ 
कोरोनामुक्त- १३,७८,१०५
सक्रिय रुग्ण- ६,०७,३८४
कोरोनामृत्यू- ४१,५८५

गत पाच दिवसातील स्थिती

दिनांक    कोरोनारुग्ण मृत्यू   
१) ३ ऑगस्ट   ५२,९७२  ७७१   
२) ४ ऑगस्ट    ५२,०५०  ८०३  
३) ५ ऑगस्ट    ५२,५०९  ८५७  
४) ६ ऑगस्ट    ५६,२८२  ९०४ 
५) ७ऑगस्ट     ६२,५३८  ८८६

एकूण-         २,७६,३५१   ४,२२० 
 

 "