Wed, Sep 23, 2020 10:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लॉकडऊनमध्ये मुलांमध्ये वाढतोय अम्ब्लोपिया

लॉकडऊनमध्ये मुलांमध्ये वाढतोय अम्ब्लोपिया

Last Updated: Aug 08 2020 12:54AM

संग्रहीत छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

लॉक डाऊन मध्ये ऑनलाईन अभ्यास आणि मुलांची चिडचिड कमी करण्यासाठी पालक मुलांच्या हातात मोबाईल देऊ लागले. त्यामुळे मोबाईल आणि टेलिव्हिजनचा अतिरेक होऊ लागल्याने सध्या मुलांमध्ये अम्ब्लोपिया नावाचा आजार बळावू लागला आहे.

चिमुरड्यापासून तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये सध्या मोबाईलचा,टिव्हीचा स्क्रीनचा अतिरेक होत आहे. सध्या तर पालक आपल्या  मुलांना शांत करण्यासाठी त्याने योग्य रीतीने जेवण्यासाठी आणि त्यांना मनविण्यासाठी त्यांच्या हातात मोबईल,व्हीडीओ गेम देण्यास सुरुवात केली. कोरोना काळात आपल्या घरी असलेल्या मुलांची चिडचिड होऊ नये, आपल्याला कामात अडचणी येऊ नये यासाठी आणि ऑनलाईन अभ्यासासाठी मुलांच्या हातात सतत मोबाईल देउ लागले. आणि लॉकडाऊन मध्ये चिमुरड्यांमध्ये अम्ब्लोपिया हा डोळ्यांचा आजार मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे.

मोबाईल टँब,व्हीडीओ गेम खेळणे आणि सतत टेलिव्हिजन वर कार्टून बघण्याने आपल्या लहान मुलांमध्ये हा महाभयंकर आजार पसरत असून पालक याबद्दल अजूनही अनभिज्ञ आहेत. अम्ब्लोपिया आजारमध्ये एक डोळा आळशी होऊन डोळे निकामी होण्याची भीती असते. लॉकडाऊनच्या काळात या याप्रकारच्या तक्रारी वाढल्या असल्याचे डॉक्टर सांगत असून पालकांनी वेळीच मुलांच्या मोबाईल आणि टीव्हीच्या सवयींवर बंधने घालणे गरजेचे असल्याचे डॉक्टर सांगतात.

लॉकडाऊनमुळे मुले सध्या घरीच आहेत. मुलांना बाहेर जाता येत ऩसल्याने मुले काहीशी चि़डचिडी बनली आहेत. चिडलेल्या किंवा रडणा-या मुलांना शांत कऱण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल फोन देतात,नाहीतर अधिक वेळ टीव्ही पाहू देतात. यामुळे मुले शांत होत असली तरी मात्र यामुळे त्यांचे शारिरीक नूकसान मात्र होते. मोबाईल असो किंवा मग टीव्ही मुले तासंनतास त्यावर आपला वेळ घालवतात. सातत्याने प्रकाश डोळ्यावर पडल्याने डोळ्यातील बाहूली लहान होते.त्यानंतर प्रकाश सहन न होऊन एका डोळ्याची क्षमता कमी होऊ लागते अशी माहीती नेत्र रोग तज्ज्ञ डॉ प्रशांत थोरात यांनी दिली.

अशा वेळी डोळ्यातून नैसर्गिक रित्या येणारे पाणी बंद होऊन कृत्रिम रित्या पाणी येणे सुरू होते.शिवाय डोळ्यांच्या कडा देखील लाल होऊ लागतात. कालांतराने मुलांना होणारा त्रास वाढतो असे ही डॉ थोरात पुढे म्हणाले.ल़ॉकडाऊनमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्या असल्याचेही ते सांगतात.

मुले मोबईलवर दोन ते चार तास सतत काहीना काही पाहत असतात. कालांतराने मुलांना मोबाईल किंवा व्हीडीओ गेम चे व्यसन लागते असे बाल रोग तज्ज्ञ डॉ.समीर दलवाई सांगतात. कालांकराने मुलांचा मोबाईल पाहण्याच कालावधी नकळत वाढत जातो.मात्र या सवयीचा विपरीत परिणाम मुलांच्या डोळ्यांवर होतो. डोळ्यांची नजर कमी होऊ लागते.अशा मुलांना अम्ब्लोपिया हा आजार होतो.म्हणजे अतिरिक्त प्रकाश पडून डोळा खराब होतो आणि तो डोळा 80 टक्के निकामी होण्याचा धोका असतो. डोळा निकामी झाला तर नंतर कधीही ठीक होत नाही.शिवाय या मुलांमध्ये हार्मोनल अम्बँलन्स तयार होतो असेही डॉक्टर दलवाई सांगतात.

सध्या प्रत्येक घरात मोबाईल, टिव्ही, लँपटॉप, व्हीडीओ गेम मुलांना दिले जातात. मैदानी खेळांकडे मुलांचा ओढा कमी झालेला दिसतो. मात्र या इलेकट्रॉनिक वस्तूंच्या वापरामुळे यामुळे अम्ब्लोपिया नावाचा आजार बळावतो आहे. हा आजार लहान मुलांच्या मुळावर उठला आहे. या आजाराला वेळीच आवर घातला नाही तर मात्र डोळे गमावण्याची भिती आहे. त्यामुळे पालकांनी सावध होण्याची गरज असून याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. मोबाईल,गेम, व्हीडीओमुळे मुलांचे डोळे खराब होत आहेत.आता मुलांवर काही निर्बंध घालण्यासाठी पालकांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे सांगत पालकांनी याबाबत जागृत राहून मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.तसेच काही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाणे गरजेचे असल्याचे दलवाई सांगतात.

अम्ब्लोपिया होऊ शकतो मुलांना त्रास
- दृष्टिदोष
- कायमचा डोळा निकामी
-पाठीला बाक येण्याची शक्यता.
-मुले हिंसक बनतात.

 "