Thu, Jul 09, 2020 20:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबई : रो- पॅक्स फेरीसेवा, टर्मिनलचे उद्या उद्घाटन 

नवी मुंबई : रो- पॅक्स फेरीसेवा, टर्मिनलचे उद्या उद्घाटन 

Last Updated: Mar 14 2020 3:01PM
नवी मुंबई : पुढारी वृतसेवा 

गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या रो - पॅक्स  प्रवासी फेरीसेवा आणि मांडवी व भाऊचा धक्का या दोन टर्मिनलचे काम नुकतेच पुर्ण करण्यात आले. यावेळी टर्मिनलसाठी १५० कोटी तर शीप पीपीपीसाठी ४६ कोटी रूपये असा एकूण सुमारे २०० कोटी रूपये खर्च मेरीटाईम बोर्डाकडून करण्यात आला. या दोन्ही टर्मिनलसह रो- पॅक्स प्रवासी फेरीसेवेचे उद्घाटन उद्या रविवारी दुपारी १२ वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मांडवी टर्मिनल येथे केले जाणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डाचे अध्यक्ष एन रामास्वामी यांनी पुढारीशी बोलताना दिली. 

अधिक वाचा : मुंबई : अजंता बोटला मांडवाजवळ अपघात (video)

मागील चार वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. नवी मुंबई महापालिका आयुक्त पदावरून मेरीटाईम बोर्डाच्या अध्यक्ष पदावर एन. रामास्वामी यांची बदली झाल्यानंतर त्यांनी या महत्वाच्या आणि रखडलेल्या प्रकल्पाची माहिती घेतली. सुमारे २०० कोटींचा हा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी आणि त्रुटी दूर करत रामास्वामी यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले. 

अधिक वाचा : तिसर्‍या मांडवी पुलाचे डांबरीकरण सुरू

या नव्याने सुरू होणाऱ्या रो - पॅक्स फेरीसेवेत एकाचवेळी ५५० प्रवाशी प्रवास करू शकणार आहेत. तर १५० वाहने या शीपमधून मांडवी ते मुंबईतने आण करता येणार आहे. भाऊचा धक्का ते मांडवी हा सागरीप्रवास ४५ मिनिटात पार केला जाणार आहे.  प्रवासाचे तिकिट दर हे २२० ते ५५० रूपये इतके असणार आहे.  त्यामध्ये एसीचे दर हे ३३० रूपये आहेत. तर लॅाजचे दर ५५० रूपये आहेत. सर्व सुविधायुक्त असे हे प्रवासी टर्मिनल उभारण्यात आले आहे. यामुळे  इंधन, वेळेची बचत होणार आहे.