Wed, Aug 12, 2020 04:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नॅशनल पार्कमध्ये गणरायाला चिखलातून निरोप

नॅशनल पार्कमध्ये गणरायाला चिखलातून निरोप

Published On: Sep 12 2019 10:31PM | Last Updated: Sep 12 2019 11:51PM
मुंबई : प्रकाश साबळे 

मुंबईसह उपनगरांत गणपती बप्पाचे खड्डयांतून आगमन आणि विसर्जन झाले. परंतु बोरिवली येथील नॅशनल पार्कमधील विसर्जन स्थळाकडे जाण्यासाठी गणेश भक्तांना चक्क चिलखातून बप्पांना घेवून जावे लागत आहे. यामुळे येथील विसर्जनासाठी आणि अखेर निरोप देण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. 

नॅशनल पार्कमधील नोका विहार या   तलावात कांदिवली, बोरिवली आणि दहिसरमधील घरगुती, सार्वजनिक गणपती बप्पाचे विसर्जन केले जाते. विसर्जन स्थळाजवळ मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने गणेश भक्तांना आपली जीव मुठीत धरून तलावापर्यंत मार्गक्रमण करावा लागत आहे. या समस्याकडे पालिका आर.उत्तर आणि नॅशनल पार्क प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने गणेश भक्तांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे.

नॅशनल पार्कमध्ये राजकिय कार्यक्रमासाठी तात्पुरता डांबरी रस्ता केला जातो. परंतु गणेश उत्सव काळात अशा कुठल्याही प्रकारची सोय केली जात नाही. यामुळे आम्हाला गणेश विसर्जन चिलखातून करावा लागत असल्याची खंत राहूल जाधव, मंगल मोरे, गणेश गुप्ता या गणेश भक्तांनी दैनिक पुढारीशी बोलतांना व्यक्त केली.