Tue, Aug 04, 2020 14:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत सात वर्षात इमारती कोसळून ३०० जणांचा बळी

मुंबईत सात वर्षात इमारती कोसळून ३०० जणांचा बळी

Last Updated: Jul 17 2020 1:46AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईमधील फोर्ट परिसरामध्ये आज (दि. १६) भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळला. या घटनेत आतापर्यंत १५ लोकांना बाहेर काढण्यात आले असून यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईसारख्या ठिकाणी पावसाळ्यात वारंवार जुन्या इमारती कोसळत असतात. यामुळे अनेकांना आपल्या जीवास मुकावे लागले आहे. तर अनेकांना कामयमचे अपंगत्व आले आहे. मागील सात वर्षात मुंबईत तब्बल ३९४५ इमारती कोसळून तब्बल ३०० लोकांचा बळी गेला आहे. तर ११४६ लोक जखमी झाले आहेत. सदरची माहिती ही माहिती अधिकाराखाली आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी मिळवली आहे. 

अधिक वाचा : एक संवेदनशील अधिकारी आणि लेखिका हरपल्या : मदान

मुंबईमध्ये जुन्या इमारती कोसळण्याचे सत्र सुरुच आहे. अशा जुन्या इमारतीचा प्रश्न राज्यसरकार तसेच मुंबई महानगरपालिका अद्याप सोडवू शकली नाही. दरवर्षी पावसाळ्यात अशा जुन्या इमारती पडण्याच्या घटना घडत असतात. या घटनांमध्ये दरवर्षी अनेकांना आपले प्राण गमावावे लागले आहे. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. तरीही अद्याप यावर कायमचा उपाय निघू शकला नाही. या जुन्या इमारतीची दुरुस्ती केली जात नाही. अथवा यामध्ये राहणारे लोक इमारत जुनी झाली तरी ती खाली करुन इतत्र स्थलांतरीत होत नाहीत. यामुळे अशा घटनांमध्ये लोकांचा बळी जात आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी मागील सात वर्षात मुंबईत कोसळलेल्या इमारती व त्यामध्ये झालेल्या जिवीत व मालमत्तेची हानी यासंदर्भात माहिती अधिकाराखाली माहिती मागवली. यामध्ये मागील सात वर्षात ३९४५ इमारती कोसळून तब्बल ३०० लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर ११४६ लोक यामध्ये जखमी झाले आहेत. 

अधिक वाचा : परिक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम

वर्षाप्रमाणे इमारती कोसळून झालेली जीवित हाणी आकडेवारी

साल                 घटना            मृत्यू              जखमी
2013 :               531               101             183
2014 :               343                21              100
2015 :              417                 15              120 
2016 :              486                 24              172
2017 :              568                 66              165
2018 :              619                 15               79 
2019 :              622                  51              227

अधिक वाचा : मुंबई : भानुशाली इमारत कोसळून दोन ठार; मुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचले
 
२०१३ ते २०१८ या सहा वर्षात ४९ हजार १७९ दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये ९८७ लोकांचा मृत्यू झाला तर ३०६६ जण जखमी झाले आहेत.  २०१९ मध्ये घर पडणे, इमारत किंवा इमारतीचा भाग कोसळणे, शॉक लागणे, नाल्यात समुद्रात वाहून जाणे, बुडणे अशा प्रकारच्या ९,९४३ आपत्कालीन दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये १३७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ५७९ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये ३७२ पुरुष तर २०७ महिलांचा समावेश आहे.